शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा दुसरा टप्पा तीन हजार कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 16:32 IST

Mukhyamantri Gram Sadak Yojana Yawatmal News मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला १ ऑक्टोबर रोजी शासनाने मंजुरी दिली आहे. हा दुसरा टप्पा तीन हजार कोटी रुपयांचा आहे.

ठळक मुद्देएशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय्यअखेर निविदा प्रक्रियेस मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संकटामुळे राज्य शासनाची आर्थिक स्थिती गंभीर आहे. त्यामुळे विकास कामांवर खर्चासाठी तेवढा पैसा उपलब्ध होत नाही. त्यावर पर्याय म्हणून आता एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून विकास कामे केली जाणार आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला १ ऑक्टोबर रोजी शासनाने मंजुरी दिली आहे.

एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्यातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे केली जातात. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे जून २०१९ मध्ये मंजूर केली गेली होती. सुमारे दीड वर्षांपूर्वी २०१८-१९ च्या दरसूचीनुसार या कामांना प्रशासकीय मान्यताही दिली गेली. योजनेचे पुणे येथील मुख्य अभियंता यांनी २८ सप्टेंबर रोजी या कामाच्या निविदा प्रक्रिया राबविण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. अखेर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये चालू दरसूचीवर आधारित तांत्रिक मान्यता देवून ही निविदा प्रक्रिया राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा हा दुसरा टप्पा तीन हजार कोटी रुपयांचा आहे. त्यातून इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग व त्यावरील पुलांचे बांधकाम केले जाणार आहे.

अमरावती विभागात ४०० किलोमीटरचे रस्तेत्यात एकट्या अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात सुमारे ४०० किलोमीटरचे रस्ते बांधले जाणार आहेत. दीड वर्षांपासून या मंजुरीची प्रतीक्षा होती. अखेर ती प्राप्त झाल्याने संबंधित अभियंते व कंत्राटदारांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाकडेमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा पहिला टप्पाही सुमारे तीन हजार कोटींचा होता. त्या टप्प्यातील अनेक कामे अर्ध्यापेक्षा अधिक पूर्ण झाली असून अनेक कामे पूर्णत्वाकडे आहेत. लवकरच ती पूर्णही होणार आहेत. या योजनेची निविदा प्रक्रिया लवकरच जिल्हास्तरावरून राबविली जाणार आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक