शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

दुसऱ्याही दिवशी ‘समृद्धी’कडे पाठ

By admin | Updated: December 22, 2016 00:13 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित महिला बचत गटांच्या ‘समृद्धि’ प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरिवली आहे.

यवतमाळ : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आयोजित महिला बचत गटांच्या ‘समृद्धि’ प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरिवली आहे. केवळ जेवणाचे स्टॉल सायंकाळी गर्दीने खचाखच असल्याचे दिसून येत आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा समावेश आहे. याअंतर्गत खास ‘उमेद’ कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. या यंत्रणेमार्फत महिलांना विविध प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था करण्यात आली. मात्र आत्तापर्यंत लाखो रूपये खर्च करूनही जिल्ह्यातील महिलांचे सक्षमीकरण नावापुरतेच दिसून येत आहे. केवळ महिला बचत गटांची स्थापना करून हा विभाग आपली कार्यकुशलता दर्शवित आहे. ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत येथील पोस्टल ग्राउंडवर चार दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. २३ डिसेंरपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. या प्रदर्शनात महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले आहे. मात्र बहुतांश बचत गटांनी पारंपारिक खाद्य पदार्थांची निर्मिती करून त्याचेच प्रदर्शन केले आहे. ग्रामीण व शहरी भागात हमखास आणि कमी किमतीत मिळणाऱ्या वस्तूच या प्रदर्शनात बहुसंख्येने ठेवण्यात आल्या. बाजारात जी वस्तू कमी किमतीत आणि चांगल्या दर्जाची मिळते, ती वस्तू या प्रदर्शनातून कोण खरेदी करणार, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. या प्रदर्शनावर दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च करण्यात येतो. बचत गटातील सदस्यांची भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात येते. चार दिवस थोडीफार जत्रा भरते, एवढाच काय तो हेतू यातून साध्य होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रदर्शनातून खरच महिला बचत गटांची किती समृद्धि होते, त्यांना किती लाभ होतो, त्यांना खरच बाजारपेठ उपलब्ध होते काय, असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहतात. त्यामुळे या प्रदर्शनाचा नेमका हेतू तरी काय, असा प्रश्न पडतो. (शहर प्रतिनिधी)