शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

‘एएसआय’च्या जागा रिक्त, जमादारांना बढतीची प्रतीक्षा

By admin | Updated: July 21, 2016 00:07 IST

जिल्हा पोलीस दलात सहायक फौजदारांच्या तीन डझनावर जागा रिक्त आहेत. मात्र त्यानंतरही जमादारांना पदोन्नती दिली जात नसल्याची ओरड आहे.

यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात सहायक फौजदारांच्या तीन डझनावर जागा रिक्त आहेत. मात्र त्यानंतरही जमादारांना पदोन्नती दिली जात नसल्याची ओरड आहे. ही पदोन्नती रखडण्यामागे लिपिकवर्गीय यंत्रणेचा कारभार जबाबदार असल्याचे सांगितले जाते. सहायक फौजदाराची जागा रिक्त झाल्यास लगेच ती प्रतीक्षा यादीतील जमादाराला पदोन्नती देऊन भरली जावे, असे शासनाचे स्थायी आदेश आहेत. त्यानुसार एक जागा रिक्त झाली तरी लगेच ती भरली जाते. परंतु यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सहायक फौजदारांच्या कित्येक जागा रिक्त आहेत. मात्र त्यानंतरही त्या भरल्या जात नसल्याची ओरड आहे. वास्तविक सेवाज्येष्ठतेनुसार जमादारांना बढती देऊन एएसआयच्या या जागा भरणे बंधनकारक आहे. मात्र पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकवर्गीय यंत्रणा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. या बढतीच्या प्रतीक्षेत अनेक जमादार सेवानिवृत्त होत आहेत. काहींची सेवानिवृत्ती अगदी तोंडावर आहे. एएसआय झाल्यास सेवानिवृत्तीनंतर त्या पदानुसार आर्थिक लाभ मिळत असल्याने जमादारांचा या चार-सहा महिन्यांसाठी का होईना पदोन्नतीसाठी जोर आहे. मात्र लिपिकवर्गीय यंत्रणा आपल्या निष्क्रीय कारभारामुळे अप्रत्यक्ष त्यात आडकाठी निर्माण करीत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह आणि कार्यालय अधीक्षकांनी याबाबीकडे जातीने लक्ष देऊन जमादारांना न्याय द्यावा, अशी पोलीस वर्तुळातील मागणी आहे. २८ ते ३० वर्ष सेवा होऊनही जमादारांना सहायक फौजदारपदी बढतीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने खरी नाराजी आहे. (प्रतिनिधी)