शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
2
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
3
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
4
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
5
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
7
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
8
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
9
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
10
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
11
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
12
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
13
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
14
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
15
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
16
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
17
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
18
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
19
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
20
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील

हंगाम संपला, कर्ज मात्र कायम

By admin | Updated: March 18, 2015 02:20 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महागाव तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. हंगाम संपला तरी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.

रितेश पुरोहित  महागावनिसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या महागाव तालुक्यातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे. हंगाम संपला तरी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे. यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध बँकांकडून १२० कोटी कर्जाची उचल केली. मात्र नैसर्गिक संकटाचा सामना करताना कर्जाची परतफेड करणे शक्यच झाले नाही. सर्वच शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. महागाव तालुक्यातील शेतकरी गत काही वर्षांपासून आसमानी संकटाचा सामना करीत आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपिट तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. दरवर्षी शेतात उद्ध्वस्त होणारे पिक पाहून तो खचतो. मात्र नव्या दमाने हंगाम सुरू झाला की कामाला लागतो. शेतात पेरणी करतो. त्यासाठी विविध बँकांचे उंबरठे झिजवितो. यावर्षी तालुक्यातील ५० हजार शेतकऱ्यांनी विविध बँकातून कर्ज घेतले. त्यात जिल्हा बँकेचे ८५ कोटी, युनियन बँकेचे २० कोटी, स्टेट बँकचे सात कोटी, सेंट्रल बँकेचे पाच कोटी असे १२० कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी घेतले. या बँकांनी शेतकऱ्यांना खरीप आणि रबी हंगामासाठी कर्ज दिले. मात्र हाती आलेल्या पिकाची परिस्थिती पाहता केवळ ३० ते ४० कोटी रुपयांचा शेतमाल शेतकऱ्यांच्या हातात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोणताही शेतकरी कर्जाची परतफेड करू शकला नाही. १०० कोटींवर कर्ज शेतकऱ्यांकडे थकीत आहे. बँकांनी शेतकऱ्यांना कर्जासाठी नोटीस बजावल्या. परंतु शेतातच पिकले नाही तर बँकेचे कर्ज कसे फेडावे असा प्रश्न आहे. यावर्षी सुरुवातीला अपुऱ्या पावसाने संपूर्ण खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. एकरी एक पोतेही सोयाबीन शेतकऱ्यांना झाले नाही. महागाव तालुक्यातील उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येऊन गेले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुडाणा येथील एका शेताची पाहणी केली. शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असताना शासनाने मात्र मदतीच्या नावाने हात आखडता घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांपर्यंत तर मदत अद्यापही पोहोचली नाही. बँकांमध्ये शेतकरी गर्दी करून आहे. अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते नसल्याने मदत परत जाण्याची भीती आहे. खरीप हंगाम अपुऱ्या पावसाने उद्ध्वस्त झाला असताना आता रबी गारपिटीने उद्ध्वस्त होत आहे. गत १५ दिवसांपासून ढगाळी वातावरण आहे. तीनदा अवकाळी पावसाने झोडपून काढले. गहू, हरभरा, भाजीपाला, संत्रा, केळी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या हातात पैसाच दिसत नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज भरावे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.