लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : आपल्या कुटुंबाची पर्वा न करता, घरदार सोडून डोळ्यात तेल घालून सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळेच आपण सुखाची झोप घेतो, असे प्रतिपादन महसूलमंत्री संजय राठोड यांनी केले. आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माजी सैनिकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष वैशाली नहाते, उपजिल्हा प्रमुख हरीहर लिंगरवार, प्रविण शिंदे, पंचायत समिती सभापती इंदू मिसेवार उपस्थित होते. प्रास्ताविक जि.प.सदस्य गजानन बेजंकीवार व संचालन प्राचार्य विजय देशपांडे यांनी केले.देशाच्या रक्षणासाठी सिमेवर लढलेल्या तालुक्यातील ५६ माजी सैनिकांचा तसेच शहिद झालेल्या कुटुंबियांचा ना.राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर देशासाठी शहिद झालेल्या विरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्वरनिनाद प्रस्तुत जागे हिंदुस्थानी हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला. कोल्हापूर येथील संचाने सादर केलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी दाद दिली. संजय झोटींग, सुभाष राठोड, संभारेड्डी येल्टीवार, दीपक कापर्तीवार, राजेश पसलावार, मदन जिड्डेवार, जानमहम्मद जिवाणी व सहकाºयांनी परीश्रम घेतले.
सीमेवरील जवानांमुळेच आपण सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:27 IST
आपल्या कुटुंबाची पर्वा न करता, घरदार सोडून डोळ्यात तेल घालून सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळेच आपण सुखाची झोप घेतो, असे प्रतिपादन महसूलमंत्री संजय राठोड यांनी केले.
सीमेवरील जवानांमुळेच आपण सुरक्षित
ठळक मुद्देसंजय राठोड : पांढरकवडा तालुक्यातील ५६ माजी सैनिकांचा सत्कार