शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘मेडिकल’चा आयोडिन साठा सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 21:58 IST

जखम निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असलेल्या आयोडिनचा येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील साठा औषधी प्रशासन विभागाने सील केला आहे.

ठळक मुद्देऔषधी प्रशासनाची कारवाई : बोगस पुरवठा, वापर थांबविण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जखम निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असलेल्या आयोडिनचा येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील साठा औषधी प्रशासन विभागाने सील केला आहे. सदर आयोडिन बोगस असल्याचे आढळून आल्याने वापर थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहे.येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक बाब म्हणून आयोडिन सोल्यूशनची स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात आली. आयोडिन सोल्यूशनचा वापर जखम निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते. सर्जरी आणि इतर विभागातही आयोडिनचा वापर करण्यात येतो. शासन स्तरावरून बहुतांश औषधांचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर खरेदी प्रक्रिया केली जाते. पोव्हीडॉन आयोडिन सोल्यूशन या कंपनीकडून मेडिकलसाठी आयोडिनची खरेदी करण्यात आली. अर्धा लिटर बॉटलची किंमत १८० रुपये आहे. विशेष म्हणजे खरेदी केलेल्या या आयोडिनची मुदत येत्या आॅक्टोबर महिन्यात संपणार आहे.सध्या वापरात असलेल्या आयोडिनच्या गुणवत्तेबाबत अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांना संशय आला. त्यांनी त्याची पडताळणी केली. तेव्हा त्यात अधिक प्रमाणात चक्क पाणी आढळून आले. त्यांनी तत्काळ औषधी प्रशासनाला सूचना देऊन आयोडिनचे नमुने स्वाधीन केले. हे आयोडिन सोल्यूशन अलकेमिस्ट रिमेडीज प्रा.लि. देवाज या कंपनीचे आहे. याचा पांढरकवडा रोडवरील एका एजंसीकडून पुरवठा करण्यात आला होता. पुरवठादार एजंसीने जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाचे सोल्यूशन दिल्याचे निष्पन्न झाले. आता हे आयोडिन सील करण्यात आले असून त्याचा वापर थांबविण्याची सूचना औषधी प्रशासन विभागाने दिली आहे. पुरवठादार एजंसी व निर्माता कंपनीवर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.अधिष्ठाता डॉ. श्रीगिरीवार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे रुग्णांवर होणारा विपरित परिणाम टाळता आला. 

टॅग्स :medicineऔषधं