यवतमाळ : जिल्हा परिषद कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेला कात्री लावली असून २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात ३ कोटी ८२ लाखांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या समुपदेशनावर १० लाख रूपये खर्च केले जाणार आहे. याशिवाय शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यासाठी पाच लाखांची तरतूद केली आहे. या नवीन बाबींचा समावेश करताना कृषी साहित्याला कात्री लावण्यात आली आहे. नव्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना केवळ पेरणी यंत्रण आणि इलेक्ट्रीक मोटरपंप ९० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणार आहे. यातही पेरणी यंत्रासाठी १० लाख, इलेक्ट्रीक मोटरपंपासाठी १ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ५० लाखांच्या ताडपत्र्या देण्यात येणार आहे. सिंचनासाठी ७० लाखांचे एचडीपीई पाईप वितरित केले जाणार आहे. तर उर्वरित यंत्र पुरवठ्याला कात्री लावण्यात आली आहे. यापूर्वी २०१४-१५ मध्ये शेतकऱ्यांना पेरणी यंत्रण, मोटरपंपासोबतच धान्य स्वच्छ करण्यासाठी स्पायरल सेपरेटर, कीड नियंत्रणाकरिता नॅपसॅक स्पे पंप, फवारणीसाठी बॅटरी आॅपरेटर स्प्रेपंप देण्यात आले आहे. चालू वर्षात शेतकऱ्यांना या यंत्राला मुकावे लागणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
कृषीच्या वैयक्तिक योजनेला कात्री
By admin | Updated: March 23, 2015 00:03 IST