शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी सुट्टीत मुलांना इस्रो बनवणार शास्त्रज्ञ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 06:27 IST

संशोधनाची अनोखी संधी; देशभरातील विद्यार्थ्यांमधून निवडणार ‘यंग सायन्टिस्ट’

- अविनाश साबापुरे यवतमाळ : उपजत कुतूहल आणि शोधक वृत्ती असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना यंदाच्या उन्हाळ्यात चक्क शास्त्रज्ञ बनण्याची संधी मिळणार आहे. हो, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) त्यासाठी विशेष मोहीम आखली आहे. येत्या उन्हाळी सुटीत विद्यार्थ्यांना दोन आठवडे प्रत्यक्ष इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन कार्य बघता येणार असून स्वत:ही संशोधन करता येणार आहे.तरुण, नव्या दमाचे शास्त्रज्ञ पुढे यावे, या उद्देशाने इस्रोने (इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन) यावर्षीपासून खास शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘यंग सायन्टिस्ट प्रोग्राम’ सुरू केला आहे. याअंतर्गत देशातील निवडक शंभर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन केंद्रात ठेवून प्रशिक्षण दिले जाणार आहे. स्पेस टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स आणि स्पेस अप्लीकेशन्स या विषयांची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती देणे, त्यातून त्यांच्या मनात अंतराळ संशोधनाची आवड निर्माण करणे असा या मोहिमेचा उद्देश आहे.महाराष्ट्रातून या मोहिमेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे म्हणून इस्रोने शासनाला सूचित केले आहे.ग्रामीण विद्यार्थ्यांना प्राधान्यसंपूर्ण वर्षभरातील विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी, अवांतर उपक्रमांमधील सहभाग महत्त्वाचा असेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देशही आहेत.कुणाला मिळेल संधीदेशातील प्रत्येक राज्यातून किमान ३ विद्यार्थ्यांची या मोहिमेसाठी निवड होणार आहे. महाराष्ट्रातील राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसईच्या कोणत्याही शाळेतील विद्यार्थी या मोहिमेसाठी अर्ज करू शकतो. मात्र तो विद्यार्थी यावर्षी नवव्या वर्गात शिकत असलेला हवा. विद्यार्थ्यांनी १४ मार्चपर्यंत आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर राज्य शासनातर्फे ही नावे २५ मार्चपर्यंत इस्रोला पाठविली जाईल, असे विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनिल मगर यांनी कळविले. उन्हाळी सुटीत दोन आठवड्यांचे प्रशिक्षण इस्रो आयोजित करणार आहे. त्यात प्रत्यक्ष विज्ञान प्रात्यक्षिकांसह नामवंत शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, अनुभव कथन, इस्रोच्या प्रयोगशाळांची पाहणी, त्यात विद्यार्थ्यांना संशोधन कार्यात भाग घेण्याची संधी मिळणार आहे.

टॅग्स :isroइस्रो