शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
Pahalgam Terror Attack : 'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
3
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
4
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
5
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
6
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
7
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
8
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
9
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
10
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
11
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
12
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
13
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
14
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
15
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
16
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
17
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
18
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
19
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
20
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार

आईसाठी दत्ताशिवाने सोडली शाळा

By admin | Updated: November 18, 2016 02:39 IST

अपंग आणि वेडसर असल्याने तिचे लग्न म्हाताऱ्याशी लावून देण्यात आले. तो मरण पावल्यावर माहेरच्यांनीही थारा दिला नाही.

सुन्न करणारी कहाणी : पती गेला, माहेर सुटले, उघड्या निवाऱ्यात मुलगाच आधारअविनाश खंदारे उमरखेड अपंग आणि वेडसर असल्याने तिचे लग्न म्हाताऱ्याशी लावून देण्यात आले. तो मरण पावल्यावर माहेरच्यांनीही थारा दिला नाही. बाजार ओट्याजवळ निराधार जगणाऱ्या या आईसाठी शेवटी तिचा छोटासा मुलगाच आई बनला. आईची काळजी घेण्यासाठी सातवीतल्या दत्ताशिवा या मुलाने शाळाही सोडली. ‘माझ्या आईची राहण्याची व्यवस्था करा. मला खूप शिकायचे आहे’, ही दत्ताशिवाची आर्त हाक आहे.डाव्या हाताने अपंग असलेली ही काहिशी वेडसर आई मुळची पुसद तालुक्यातील लोणदरीची रहिवासी. तिच्या ढासळलेल्या मनस्थितीमुळे घरच्यांनी तिचे लग्न चोंढी गावातील एका म्हाताऱ्याशी लावून दिले. पदरात दत्ताशिवा हे बाळ टाकून तो म्हाताराही देवाघरी गेला. ती लेकरू घेऊन माहेरी आली. पण तेथे तिला सतत मारहाण सुरू झाली. शेवटी तिने माहेरही सोडले. ती मुळावा गावात आली. काही दिवस बसस्थानक परिसरात भिक मागून जगत राहिली. परंतु, पावसाळा लागताच निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला. अखेर तिने आठवडी बाजारातील टीनशेडचा आधार घेतला. पण मंगळवारी बाजाराच्या दिवशी हा आधारही मिळत नव्हता. आईसोबत लहानगा दत्ताशिवा हाल भोगत कसाबसा जगतो. आठ वर्षांचा दत्ताशिवा लोणदरीला आजोबाकडे राहून शाळेत जाऊ लागला. आता आई कुठे गेली असेल याची त्याला कल्पना नव्हती. आईसाठी तो व्याकूळ होता. त्याला कोणीच काही सांगत नव्हते. अन् अचानक एक दिवस आई लोणदरीत पोहोचली. दत्ताशिवाचा आनंद गगनात मावेनासा झाला. पण तेवढ्यात आजोबाने दारुच्या नशेत पुन्हा आईला हाकलून दिले. आता पुन्हा ताटातूट होणार हे लक्षात आल्याबरोबर दत्ताशिवानेही आईसोबत बाहेरची वाट धरली. जंगल तुडवित ते मुळाव्यात पोहोचले. आईसाठी दत्ताशिवाने शाळा सोडली. आजोबाचे सुरक्षित घर सोडले. आता तो दिवसभर भिक मागून दोघांचाही उदरनिर्वाह करू लागला. या जगात आईला वृद्धाश्रमात पाठविणारे कमी नाहीत. पण दत्ताशिवाने आईसाठी सुरक्षित निवारा सोडून भटके जीवन पत्करले.डोळ्याला लागल्या अश्रूच्या धारादत्ताशिवाच्या वेडसर आईचा समाजातील कुप्रवृत्तीने गैरफायदा घेतला. काही दिवसांपूर्वीच उमरखेडच्या शासकीय रुग्णालयात तिची प्रसूती झाली. आता या माय-लेकरांची जबाबदारी घेण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. ही स्थिती पाहून आठ वर्षांचा दत्ताशिवाय धायमोकलून रडला. आईच्या राहण्याची व्यवस्था करा. मला शिकायचे आहे, एवढाच त्याचा टाहो आहे.