शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

पुसदमध्ये शालेय आरोग्य तपासणीचा बोजवारा

By admin | Updated: January 8, 2015 23:02 IST

विद्यार्थी सुदृढ राहून त्यांचे शालेय अध्ययनात लक्ष लागावे म्हणून शासनाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सक्तीची केली आहे. त्यातच सिकलसेल या आजाराचा प्रादूर्भाव विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत.

पुसद : विद्यार्थी सुदृढ राहून त्यांचे शालेय अध्ययनात लक्ष लागावे म्हणून शासनाने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सक्तीची केली आहे. त्यातच सिकलसेल या आजाराचा प्रादूर्भाव विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. या आजाराने ग्रस्त विद्यार्थी शोधण्याचे आव्हान आहे. अलिकडेच एका विद्यार्थ्याचा सिकलसेल आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे पुसद तालुक्यात शालेय आरोग्य तपासणीचा बोजवारा उडाल्याचे दिसून येते. अपंग आणि सिकलसेल आजाराने ग्रस्त असलेल्या विद्यार्थ्याने १० वी आणि १२ वीच्या परीक्षेत अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्यमान उंचावून त्यांचे शिक्षणात लक्ष लागावे यासाठी आरोग्य तपासणी सक्तीची केली आहे. सिकलसेलग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षेत अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. आरोग्य तपासणीत सिकलसेलग्रस्त विद्यार्थी आढळून येत नसल्याने त्यांना शोधायचे कसे असे आव्हान प्रशासनापुढे आहे. मात्र तपासणीच एक सोपस्कार बनल्याने हे आव्हानही कितपत पेलले जाईल याबद्दलही शंका व्यक्त होत आहे. तालुक्यात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सिकलसेल आजराचा प्रादुर्भाव आहे हे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात सिकलसेलचे युनीट आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत दरवर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होते. त्यात आजारी असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष उपचार देऊन सुदृढ करणे अथवा आजार नियंत्रित करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)