शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

 शाळेच्या स्वयंपाकी महिल्या धडकल्या जिल्हा परिषदेवर; २६ हजार मानधन देण्याची मागणी

By अविनाश साबापुरे | Updated: June 19, 2023 19:14 IST

शाळेत पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना प्रेमाने वाढणाऱ्या महिलांनी सोमवारी थेट जिल्हा परिषदेवर धडक देत दरमहा २६ हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली.

यवतमाळ : शाळेत पोषण आहार शिजवून विद्यार्थ्यांना प्रेमाने वाढणाऱ्या महिलांनी सोमवारी थेट जिल्हा परिषदेवर धडक देत दरमहा २६ हजार रुपये मानधन देण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियनच्या (आयटक) नेतृत्वात यावेळी शेकडो महिलांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

तब्बल २० वर्षे या महिलांना केवळ हजार रुपये मानधनावर राबविण्यात आले. आता एप्रिलपासून त्यांचे मानधन अडीच हजार केले. मात्र तेही वेळेवर मिळत नाही. या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्रसरकारने ६० टक्के व राज्य सरकारने ४० टक्के निधी देण्याचे ठरले आहे. सध्या केंद्र शासन दरमहा ६०० व राज्य शासन १९०० असे एकत्रित २५०० मानधन देत आहे. राज्य शासनाने आपल्या कोट्यात वाढ करून १९०० रुपये केले. परंतु केंद्रसरकारने वाढ केली नाही. त्यातही मानधन चार पाच महिने विलंबाने मिळते. त्यामुळे रोष आहे. शिवाय या महिलांना शाळेतील इतरही कामे करायला भाग पाडले जाते. त्यामुळे पूर्णवेळ कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व पंतप्रधानांना पाठविण्यात आले.

 यावेळी आयटकचे दिवाकर नागपुरे, विजय ठाकरे, विलास ससाने, सुरेश गायकवाड, दुर्गा ससाने, शशिकला घोटेकार, तुळसाबाई मेशेकार, वंदना तिवशे, दुर्गा नेहारे, गीता पुसनाके, सुरेखा कुमरे, सुवर्णा टेकाम, वनिता उईके, रेखा सलाम, सुनंदा वाठोळे, गीरजा तिकाडे, शकुंतला कासार, मंगला आरके, मंदाबाई वड्डे, कल्पना मेश्राम, नवसा बोरकर, मीराबाई पवार, रूंदा आडे, दिव्याणी आत्राम, कमला मेश्राम, प्रभा चामलाटे, कल्पना पाटील, सारिका कोवे, मतान शेख, झुबेदा बी पठाण, संगीता कुळमते, गीरजा मडावी, निता मेश्राम, रेखा गेडाम, कमला मेश्राम, तुळसा सीडाम, निर्मला पवार, दुर्गा बनारकर, प्रीती शेंबळे, शशिकला शेळके, सुनिता नेवारे, नंदाबाई बोटरे, निर्मला गेडेकार, मंगला परचाके, सुवर्णा कंगाले, भास्कर कांबळे, विठ्ठल लोनकर यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. १९४८ च्या किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी सरकार करीत नाही. त्यामुळे श्रमिकांना स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही किमान वेतन मिळत नाही. मात्र आमदारांचे दरमहा मानधन दोन लाखाच्या जवळपास आणि खासदारांचे मानधन तीन लाखांच्या जवळपास आहे. इतर भत्ते, पेन्शन लागू आहे. मग योजना कर्मचारी अडीच हजारात या महागाईत कसे जगत असतील, याचाही विचार सरकारने करावा. - दिवाकर नागपुरे, आयटक, यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळ