शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क सेस फंडातून

By admin | Updated: January 3, 2015 23:09 IST

जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत सर्वसामान्य मुलांना दिलासा देणारा ठराव घेण्यात आला. ग्रामीण भागातील मुलांकडे बरेचदा शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी पैसे राहात नाही.

यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत सर्वसामान्य मुलांना दिलासा देणारा ठराव घेण्यात आला. ग्रामीण भागातील मुलांकडे बरेचदा शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्यासाठी पैसे राहात नाही. त्यामुळे अशा अडचणीत असलेल्या मुलांचा भार शिक्षण विभाग उचलणार आहे. त्यासाठी सेस फंडातून विशेष तरतूद केली जाणार आहे. तालुकास्तरावर विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनासाठीसुध्दा सेस फंडातून निधी देण्याचा प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात आला. चांगली शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या शाळांची निवड करून त्यांचा सत्कार करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी तीन प्राथमिक आणि तीन उच्च प्राथमिक शाळांची निवड केली जाणार आहे. शाळांच्या गुणवत्तेचे म्ूुल्यमापन करण्यासाठी पथकाचे गठन करून त्यांना भौतिक सुविधा देण्यात येणार आहे. शाळा अनुदानातून साहित्य खरेदी करून त्याला कात्री लावण्यात येवू नये, असे निर्देश देण्यात आले. आजारी शिक्षकांच्या देयेकाचा मुद्दा दिगांबर जगताप यांनी बैठकीत उपस्थित केला. वर्षा पाटील आणि संदीप हिंंगमिरे यांनी शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी केली जावी, अशी मागणी केली. याची तत्काळ दखल घेऊन सभापती नरेंद्र ठाकरे यांनी तसे निर्देश सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्याचा आदेश दिला. बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उपशिक्षाधिकारी वाल्मिक इंगोले, समिती सदस्य द्वारका पारध, अल्का टेकाम, अ‍ॅड़ सीमा तेलंगे आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)