शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हणे, पाणी प्रश्न मिटला, मोर्चेही थांबले

By admin | Updated: June 9, 2014 00:09 IST

धरणातील मृतसाठा उपयोगात आणल्याने यवतमाळकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे, आता कुणाचे मोर्चे नाही आणि आंदोलने नाहीत. हे वाचून कुणालाही धक्का बसेल. परंतु हे चित्र खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या

जीवन प्राधिकरण : खोट्या अहवालाचे बिंग फुटले विलास गावंडे - यवतमाळधरणातील मृतसाठा उपयोगात आणल्याने यवतमाळकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे, आता कुणाचे मोर्चे नाही आणि आंदोलने नाहीत. हे वाचून कुणालाही धक्का बसेल. परंतु हे चित्र खुद्द महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या  येथील कार्यकारी अभियंत्यांनीच ठाणे मुख्यालयात कागदावर रंगविले आहे. एवढेच नव्हे तर पाणीटंचाईचे मूळ ठरलेल्या वादग्रस्त उपअभियंत्याला चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्रही देण्यात आले आहे. कार्यकारी अभियंत्याचा हा खोटा अहवाल फुटल्याने प्राधिकरणात खळबळ निर्माण झाली आहे. यवतमाळ शहराच्या सर्व भागात पाण्यासाठी टाहो सुरू आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच प्रत्येक भागातील मोर्चे प्राधिकरणावर धडकले. एवढेच नव्हे तर अधिकार्‍याच्या अंगावर शाई फेकण्याचा आणि ‘गांधीगिरी’चाही प्रकार घडला. असे असताना प्राधिकरणाच्या येथील कार्यकारी अभियंत्याने मात्र दारव्हेकर यांची चांगलीच पाठराखण केली आहे. केवळ २0 दिवसात त्यांनी जणू ‘चमत्कार’ घडविल्याचा कांगावा केला गेला. प्राधिकरणाच्या ठाणे मुख्य अभियंत्यांना तसे पत्रही पाठविले. दारव्हेकर यांनी प्रकल्पातील अशुद्ध पाणी (मृतसाठा) मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्याच बळावर त्यांनी जलशुद्धीकरण केंद्रात जणू पाण्याची गंगा अवतरल्याचा देखावा निर्माण केला. टाकींमध्ये पुरेसे पाणी साठविले जात आहे, परिणामी प्राधिकरणावर नागरिकांचे मोर्चे थांबल्याचेही वरिष्ठांना कळविले गेले. दारव्हेकर यांचे ‘कौतुक’ एवढय़ावरच थांबले नाही तर शहराच्या पाणीपुरवठय़ाचे वितरण ते व्यवस्थितपणे करत असल्याचे प्रशस्तीपत्रही दिले गेले. हे पत्र आणि वास्तव स्थिती पाहून कुणालाही धक्का बसेल. या पत्राने प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किती खोटारडे आहे हे सिध्द झाले आहे. वास्तविक यवतमाळ शहरातील जनतेला आजही तीन ते चार दिवसांपर्यंत पाणी मिळत नाही. ‘सारी रात जागली, हाती नाही लागली’ अशी अवस्था आहे. असे असतानाही वरिष्ठांनी दारव्हेकरांचा एवढा उदोउदो करण्यामागील ‘रहस्य’ अद्याप कुणालाही उलगडलेले नाही. दारव्हेकरांनी वरिष्ठांना ‘खूष’ करून तर हे पत्र मिळवून घेतल नाही ना, अशी शंका प्राधिकरणात व्यक्त केली जात आहे.