शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

बँक खात्यांतून सव्वादोन लाख उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:07 IST

बनावट एटीएमचा अथवा अन्य तंत्राचा वापर करून अज्ञात भामट्यांनी वणीतील तीन ग्राहकांच्या स्टेट बँकेतील खात्यातून दोन लाख १७ हजार रूपये उडविल्याची घटना उजेडात आली आहे. या तिनही ग्राहकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. संबंधित बँकेने मात्र याविषयात हातवर करून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

ठळक मुद्देस्टेट बँकेतील खाते : वणीतील तीन ग्राहकांना भामट्यांनी दिला आॅनलाईन ‘शॉक’

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बनावट एटीएमचा अथवा अन्य तंत्राचा वापर करून अज्ञात भामट्यांनी वणीतील तीन ग्राहकांच्या स्टेट बँकेतील खात्यातून दोन लाख १७ हजार रूपये उडविल्याची घटना उजेडात आली आहे. या तिनही ग्राहकांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. संबंधित बँकेने मात्र याविषयात हातवर करून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.वणी शहरातील प्रगतीनगर भागातील रहिवासी शेख निसार शेख महेबूब (५३) यांचे वणीतील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत खाते आहे. शेख निसार हे वेकोलिच्या वाहनावर खासगी चालक म्हणून काम करतात. त्यांनी पै-पै करून पुंजी जमविली आणि ही रक्कम सुरक्षित राहावी म्हणून स्टेट बँकेच्या स्वत:च्या खात्यात जमा केली. मात्र २ ते ४ मे या तीन दिवसांच्या कालावधीत त्यांच्या खात्यातून जवळपास एक लाख ४० हजार रूपये उडविण्यात आले. बनावट एटीएमचा वापर करून ही रक्कम उडविण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहे. २ मे रोजी ४० हजार रूपये, ३ मे रोजी ४० हजार रूपये, ४ मे रोजी वेगवेगळ्या वेळात दोनदा १० हजार व एकदा ४० हजार, अशा प्रकारे रक्कम अज्ञात भामट्यांनी उडविली. ही बाब लक्षात आल्यानंतर शेख निसार यांनी यासंदर्भात बँकेला विचारणा केली असता, बँकेकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात वणी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि ४२० व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० नुसार ६६ (सी.) अन्वये गुन्हा दाखल केला.यासोबतच २ मे रोजीच वणी शहरातील रत्ना संजय लडके या महिलेच्या खात्यातून सात हजार रूपये अज्ञात भामट्यांनी उडविले. त्यांनीदेखील वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तसेच कडूकार नामक व्यक्तीच्या खात्यातूनही ७० हजार रूपये उडविण्यात आले आहे. त्यांनीदेखील पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गेल्या काही महिन्यात बँक खात्यातून रक्कम उडविण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. २८ जानेवारी रोजी नांदेपेरा येथील एका युवा शेतकऱ्याच्या खात्यातून ३१ हजार रूपयांची रक्कम उडविण्यात आली होती.तसेच त्याच महिन्यात जयश्री भोयर नामक महिलेच्याही खात्यातून जवळपास २४ हजार रूपये अज्ञात भामट्यांनी उडविले होते. या दोनही घटनेच्या तक्रारी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. मात्र त्यातून अद्यापतरी काहीही निष्पन्न झाले नाही. रक्कम सुरक्षित राहावी म्हणून सामान्य माणुस बँक खात्यात पैसे जमा करतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून घडणाºया या घटनांमुळे ग्राहकांच्या खात्यातील पैसे खरच सुरक्षित आहे का, असा प्रश्न या घटनांनी निर्माण झाला आहे.स्टेट बँकेतील ग्राहकांची संख्या मोठी असून बँकेची शाखादेखील देशभर आहे. ही बँक ग्राहकांना कधीही एटीएमचा कोड विचारत नाही अथवा त्यासंदर्भात कोणतीही माहिती घेत नाही. त्यामुळे ग्राहकांनी अज्ञात व्यक्तीला आपल्या एटीएमसंदर्भात कोणतीही माहिती देऊ नये. एटीएममधून रक्कम काढल्यानंतर कॅन्सलचे बटण दाबावे.डी.एस.धकाते,प्रभारी व्यवस्थापक स्टेट बँक, वणी.