वैशाली डोळस यांचे मार्गदर्शन : सत्यशोधक महिला व अध्यापक महिला मंचचे आयोजन यवतमाळ : सत्यशोधक महिला विचार मंच आणि सत्यशोधक अध्यापक महिला विचार मंचच्यावतीने क्रांतिज्योती सावित्रीआई फुले जयंती समारोह घेण्यात आला. या कार्यक्रमात सुनीता प्रवीण अजमिरे, मृणालिनी दहीकर, लिलाताई साहेबराव राठोड यांचा त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सत्कार करण्यात आला. येथील गुरुदेव मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मायाताई गोबरे होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून अॅड. वैशाली डोळस (औरंगाबाद) या लाभल्या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रीती ग्रेसपुंजे, डॉ. हर्षलता पेटकर, प्रा. सुजाता गवई, रेणूताई शिंदे, प्रा.डॉ. छाया महाले, मालाताई ठाकरे, कीर्तीताई चेटुले, लता सोनटक्के, प्रा. सविता हजारे, शशीकलाताई भवरे, विजुबाई कानंदे आदी उपस्थित होते. ‘स्त्रियांची क्रांती प्रेरणा - सावित्रीआई फुले’ या विषयावर बोलताना अॅड. वैशालीताई डोळस म्हणाल्या, स्त्रियांनी चौकटीतील मनुवादी विचार आणि समाज व्यवस्थेची चिकित्सा करणे गरजेचे आहे. आयुष्यात विज्ञानवादी होवून सावित्रीच्या विचार स्वातंत्र्याची व्याख्या समजून घ्यावी, असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित विचार मांडले. या कार्यक्रमात वंदना डगवार यांनी सावित्रीचा संदेश एकपात्री प्रयोगातून दिला. प्रास्ताविक सुनीता काळे, संचालन नम्रता खडसे, आभार संगीता डहाणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी कमलताई खंडारे, माधुरी फेंडर, निता दरणे, वैशाली फुसे, कल्याणी मादेशवार, अनिता गोरे, मालती रत्ने, सुनंदा मडावी, रेखा कणाके, वंदना डवले, कल्पना नागरीकर, शोभना कोटंबे, रितू धवने, रितू ठवकर, वर्षा महाजन, प्रा. श्रद्धा धवने, उषा सोनटक्के, सरिता चानपुरकर आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)
सावित्रीच्या लेकींचा कार्यगौरव
By admin | Updated: January 15, 2017 01:15 IST