शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

छकुलीला वाचविताना आई बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 22:28 IST

राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील मानव निर्मित तलावात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली. रेखा उर्फ कालिंदा देवेंद्र पेंद्राम (४०) रा. वाढोणा बाजार असे मृत महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देवाढोणा बाजारची घटना : कृत्रिम तलावात मृत्यू, मुलगी बचावली

लोकमत न्यूज नेटवर्कवाढोणाबाजार : राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार येथील मानव निर्मित तलावात बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली.रेखा उर्फ कालिंदा देवेंद्र पेंद्राम (४०) रा. वाढोणा बाजार असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी घरातील कामे आटोपून कालिंदा आपली मुलगी छकुली (१५) हिच्यासह धुणे धुण्यासाठी एका महाविद्यालयामागील मानव निर्मित तलावावर गेल्या होत्या. धुणे धुत असताना अचानक छकुलीचा तोल गेल्याने ती पाण्यात बुडाली. तिला वाचविण्यासाठी कालिंदाने पाण्यात उडी घेतली. तोपर्यंत मुलगी छकुलीने आरडाओरडा केल्याने परिसरात असलेल्या लक्ष्मण निमसटकर या तरुणाने घटनास्थळी धाव घेतली. त्याने पाण्यात उडी मारुन छकुलीला बाहेर काढले. तोपर्यंत कालिंदा पाण्यात बुडाली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला.वाढोणा बाजार येथे एका महाविद्यालयामागे कळंब-राळेगाव-वडकी सिमेंट रस्ता बांधणाऱ्या बांधकाम कंपनीने मुरुमासाठी उत्खनन केले. या उत्खननामुळे तेथे तलाव सदृश मोठा खड्डा निर्माण झाला. यात पावसाचे पाणी साचल्याने त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. गावातील अनेक महिला याच तलावावर धुणे धुण्यासाठी जातात. त्यातूनच रविवारी ही घटना घडली. त्यामुळे रस्ता बांधकाम कंपनीविरुद्ध रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेची नागरिकांनी वडकी पोलिसांना माहिती दिली. संतप्त नागरिकांनी बांधकाम कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल होतपर्यंत मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर कंपनीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला.

टॅग्स :Deathमृत्यू