शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

सावकारांना दत्त चौकातून सात कोटींचा फायनान्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:33 IST

यवतमाळ शहरातील बाजारपेठेत अवैध सावकारीची पाळेमुळे खोलवर रुजली असून विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मंडळी त्याला पाणी घालत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देप्रतिष्ठितांची गुंतवणूक : सहकार, प्राप्तीकरची भीतीच संपली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरातील बाजारपेठेत अवैध सावकारीची पाळेमुळे खोलवर रुजली असून विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मंडळी त्याला पाणी घालत असल्याचे दिसून येते. वैद्यकीय क्षेत्रातील अशाच तीन प्रतिष्ठांनी दत्त चौकातील मध्यस्थामार्फत अवैध सावकारीत तब्बल सात कोटींचे फायनान्स केल्याची माहिती पुढे आली आहे.यवतमाळात अवैध सावकारी प्रचंड मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल त्यात होत आहे. केवळ व्याजापोटी लाखो रुपयांची देवाणघेवाण होत आहे. ‘तक्रार आल्याशिवाय कारवाई नाही’ या सहकार, महसूल, पोलीस, प्राप्तीकर खात्याच्या भूमिकेमुळे अवैध सावकारीला आणखी फोफावण्यात हातभार लागतो आहे. सावकारांमध्ये उपरोक्त शासकीय विभागांची दहशतच राहिलेली नाही. या विभागाच्या अधिकाºयांना सावकार जुमानत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच वरकमाईतील काळा पैसा अवैध सावकारीत गुंतविण्याचा सपाटा सुरु आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तिघांचा असाच एक कारनामा सध्या अवैध सावकारांमध्ये चर्चेत आहेत. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातील तिघांनी दत्त चौकातील एका मध्यस्थामार्फत अवैध सावकारांना सात कोटी रुपये फायनान्स केले आहे. सतत व्यवसाय बदलण्याची सवय लागलेल्या या मध्यस्थाने आपल्याच आजूबाजूच्या गरवंत व्यापाºयांना सावकारीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रकमा उपलब्ध करून दिल्या आहेत. हे पैसे देण्यापूर्वी त्यांच्याकडून कोरे धनादेश घेण्यात आले आहे. या सात कोटींच्या फायनान्सपोटी दरमाह लाखो रुपये व्याज वसूल केले जाते. एकाच चौकातून सात कोटींचा व्यवहार होण्याचे हे जणू प्रातिनिधीक उदाहरण आहे. यवतमाळात अशा पद्धतीने शेकडो कोटींचे फायनान्स अवैध सावकारीत झाल्याचे बोलले जाते.सर्वच यंत्रणा अनभिज्ञ कशी ?कोण्या सावकाराला कोण फायनान्स करतो, कोण सावकार कुठे बसतो, कुणाचे व्यवहार कोण पाहतो, कोण सावकार किती टक्के व्याज देते, कोण प्रतिष्ठीत कुणाच्या मध्यस्थीने फायनान्स करतो, कोण सावकार कुण्या गुंतवणूकदार, बिल्डरच्या कनेक्टमध्ये आहे याची इत्यंभूत माहिती शहरातील अनेकांना आहे. मात्र ही माहिती शासनाच्या सहकार, प्राप्तीकर, पोलीस, महसूल व अन्य संबंधित विभागांना असू नये याबाबत आश्चर्य वाटते. हे विभाग या अवैध सावकारीबाबत अनभिज्ञ राहूच शकत नाहीत, त्यांचे लागेबांधे असावे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. दत्त चौकातील मध्यस्थामार्फत गुंतवणूक करणाºया पॅथ-बारचा अनुभव असलेल्या त्या तीन प्रतिष्ठीतांचीही चर्चा अवैध सावकार व वसुलीकर्त्यांमध्ये जोरात सुरू आहे.