शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांनी चुकीचा इतिहास सांगितला; पत्रकार परिषदेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:59 IST

Yavatmal : १८ सप्टेंबरला फुले, शाहू, आंबेडकर संघटनांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : रायगडावरील छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम शोधून काढली. असे दस्तावेज आहे. महात्मा फुले यांनी स्वतः दिनबंधू अंकात तसे लिहिले. यानंतरही लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. अशी चुकीची माहिती सांगितल्याचा गंभीर आरोप फुले, शाहू, आंबेडकरवादी संघटनांनी केला आहे. बहुजन समाजाच्या खच्चीकरणासाठी हे संघाचे पाऊल असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. याविरोधात आवाज उठवीत १८ सप्टेंबरला महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ निषेध नोंदवीत धरणे दिले जाणार आहे

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुण्यातील कार्यक्रमात छत्रपती शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढल्याचे सांगितले. १८६९ मध्ये प्रथम महात्मा फुले रायगडावर गेले. त्यांनीच समाधीचा शोध लावला आहे. त्यावेळी बाळगंगाधर टिळक १३ वर्षांचे होते. १८८० मध्ये पुण्यात आणि रायगडावर फुलेंनी शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. १८९३ मध्ये टिळकांनी गणेश उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. 

सर्व तज्ज्ञ, इतिहास संशोधक, अभ्यासक, पोलिस खात्यांचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागाराची कागदपत्रे, पुरावे उपलब्ध असतानाही चुकीची माहिती पसरविली जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. याविरोधात आवाज उठवीत १८ सप्टेंबरला महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ घटनेचा निषेध करीत धरणे आंदोलन होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी अॅड. अरुण मेत्रे, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, प्रदीप वादाफळे, संजय यवतकर, बाळू निवल, सुनयना यवतकर, शशांक केंढे, विलास काळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघYavatmalयवतमाळ