शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

संत रामराव महाराज पंचत्वात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान, धर्मगुरू, महान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यावर रविवारी ...

ठळक मुद्देपोहरादेवी येथे अंत्यदर्शनासाठी जनसागर : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशातील कोट्यवधी बंजारा समाज बांधवांचे श्रद्धास्थान, धर्मगुरू, महान तपस्वी डॉ. रामराव महाराज यांच्यावर रविवारी श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा, जि. वाशिम) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.उपस्थित अनुयायी, भाविकांनी साश्रुनयनांनी डॉ. रामराव महाराजांचे अंतिम दर्शन घेतले.संत सेवालाल महाराजांचे वंशज असलेल्या तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे शुक्रवारी रात्री मुंबई येथे देहावसान झाले. त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे पार्थिव ३१ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पोहरादेवी येथे आणण्यात आले.अंत्यसंस्कारापूर्वी तपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे पार्थिव जगदंबा देवी मंदिर व संत सेवालाल महाराज मंदिरात नेण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रा मठाच्या परिसरात तयार करण्यात आलेल्या अंत्यविधीस्थळी आली. यावेळी उपस्थित अनुयायी, भक्तांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या २१ फैरी झाडून सलामी देण्यात आली. मंत्रोच्चारानंतर परिवारातील सदस्यांनी डॉ. रामराव महाराज यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.यवतमाळच्या अनुयायांचीही धावसंत डॉ. रामराव महाराज यांच्या अंत्यदर्शनासाठी यवतमाळ जिल्ह्यातून हजारो अनुयायांनी पोहरादेवी येथे धाव घेतली. खासदार भावना गवळी, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, आमदार तथा माजी राज्यमंत्री मदन येरावार, यवतमाळचे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, मखराम पवार यांची अंत्यसंस्कारावेळी प्रमुख उपस्थिती होती. तसेच शनिवारी रात्री महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे आदींनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

टॅग्स :Deathमृत्यू