यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. संदीप सोनी यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवीने सन्मानित केले. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘इव्हॅल्यूशन आॅफ हँडल प्रॉपर्टीज आॅफ डेनिम फॅबरीक बाय सब्जेक्टीव्ह अँड आॅब्जेक्टीव्ह मेथड्स’ असा होता.प्रा. सोनी हे जेडीआयईटीमध्ये १९९८ पासून कार्यरत आहेत. त्यांनी २० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांच्या संशोधनामुळे महाविद्यालयाला भारत सरकारतर्फे टेक्सटाईल अभियांत्रिकी क्षेत्रातील पेटेंटही बहाल करण्यात आले आहे.
‘जेडीआयईटी’चे संदीप सोनी आचार्य पदवीने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:57 IST