शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

वाळू तस्करांनी उभारले स्वत:चे नेटवर्क अल्पवयीनांचा वॉच डॉग म्हणून वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 05:00 IST

कायदा मोडायचा असेल तर प्रशासकीय यंत्रणा विकत घ्यावी लागते. त्यात कुणी विकले जाणार नसेल तर त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचा अंकुश ठेवावा लागतो. यासाठीच अल्पवयीन मुलांचा वापर संघटित गुन्हेगार करीत आहे. काही गुन्हेगारांनी तर या अल्पवयीनांच्या हातात देशी कट्ट्यासारखे अग्नीशस्त्रही दिले आहे. ही बाब समाजात विखार पसरविणारी आहे. अल्पवयीन गुन्ह्यात अडकला तरी जामिनाचा खर्च येत नाही. आतापर्यंत या अल्पवयीनांच्या टोळ्या पोलीस रेकॉर्डवरही आलेल्या नाहीत. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात पोलीस यंत्रणा, इतर गोपनीय शाखांकडे नसेल इतके लाईव्ह खबऱ्यांचे नेटवर्क रेती तस्करांनी उभे केले आहे. यासाठी वॉच डाॅग म्हणून अल्पवयीन मुलांचा वापर केला जात आहे. दारू, गांजा या नशेच्या आहारी लागलेल्या मुलांना दुचाकीत पेट्रोल व रात्रीची पार्टी इतकाच मेहनताना दिला जातो. हे काम करताना थ्रील येत असल्याने अल्पवयीन मुले वेड्यासारखी पाळत ठेवून असतात. इच्छा असूनही अधिकारी, कर्मचारी रेतीवर ठोस कारवाई करू शकत नाही. रेती घाटाचे लिलाव झाले, अधिकृत पास देण्यातही आली. मात्र अधिक नफा कमविण्याच्या नादात माफियांकडून गेल्या काही वर्षांमध्ये स्वतंत्र यंत्रणाच उभी करण्यात आली आहे. निसर्गाने तयार केलेली रेती अक्षरश: ओरबडून काढण्याचे काम होत आहे. पैसा दिसला की, माणूस थांबत नाही, परिणामाचीही चिंता करीत नाही, नेमका हाच प्रकार रेती तस्करीत घडत आहे. रेतीच्या चोरट्या व्यवहारातून मोठी आर्थिक उलढाल होते. याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक जण लाभार्थी आहेत. त्यामुळेच आजपर्यंत रेतीचा व्यवहार शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार झालाच नाही. कायदा मोडायचा असेल तर प्रशासकीय यंत्रणा विकत घ्यावी लागते. त्यात कुणी विकले जाणार नसेल तर त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचा अंकुश ठेवावा लागतो. यासाठीच अल्पवयीन मुलांचा वापर संघटित गुन्हेगार करीत आहे. काही गुन्हेगारांनी तर या अल्पवयीनांच्या हातात देशी कट्ट्यासारखे अग्नीशस्त्रही दिले आहे. ही बाब समाजात विखार पसरविणारी आहे. अल्पवयीन गुन्ह्यात अडकला तरी जामिनाचा खर्च येत नाही. आतापर्यंत या अल्पवयीनांच्या टोळ्या पोलीस रेकॉर्डवरही आलेल्या नाहीत. हे वॉच डॉग रेती तस्करांना दिवसरात्र माहिती पुरवत असतात. कोणता रस्ता सुरक्षित आहे, रेतीचे ट्रक, इतर वाहन कोठून नेता येईल याचे लाईव्ह लोकेशन दिले जाते. संबंधित तस्कर या सर्वांशी सतत संपर्कात असतो. आजपर्यंत अशा रेती तस्करांचे मोबाईल रेकार्डही तपासण्यात आले नाही. यातून ही टोळी किती मोठी व घातक आहे, हे स्पष्ट होते. 

 अधिकारीही भयभीत- रेती तस्करांविरुद्ध कारवाई करताना वर्ग-१ दर्जाचे अधिकारीही भयभीत होतात. सतत त्यांची टेहळणी सुरू असते. याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. शासकीय निवासस्थान असो, कार्यालय असो कायम कुणाची ना कुणाची नजर असते. या नजरेतून वाचण्यासाठी काही क्लृप्त्या अधिकाऱ्यांना लढवाव्या लागतात. कर्तव्यासाठी वेगळी वाट निवडणारे फार कमी आहे. यामुळेच महसुलातील अधिकाऱ्यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केले तर काहींनी शस्त्र परवाने घेतले आहे.

 

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करी