शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातून वणीत वाळूची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:18 IST

वणी तहसील कार्यालयाच्या रॅपेड अ‍ॅक्शन टिमने तालुक्यातील अनेक रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता परजिल्ह्यातील वाळू तस्करांनी डोकेवर काढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वणी शहरात अवैधरित्या रेती आणली जात असल्याची बाब महसूल विभागाने केलेल्या एका कारवाईतून उघड झाली आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाने टिप्पर पकडले : घुग्गूसच्या वर्धा नदीतून रेतीची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी तहसील कार्यालयाच्या रॅपेड अ‍ॅक्शन टिमने तालुक्यातील अनेक रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता परजिल्ह्यातील वाळू तस्करांनी डोकेवर काढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वणी शहरात अवैधरित्या रेती आणली जात असल्याची बाब महसूल विभागाने केलेल्या एका कारवाईतून उघड झाली आहे.वणी येथे नव्यानेच रूजू झालेले तहसीलदार धनमने यांनी पदाची सुत्रे हाती घेताच, रेती तस्करांना रडारवर घेतले. यादरम्यान अनेक तस्करांविरूद्ध कारवाई करून त्यांच्याकडून लाखो रूपयांचा दंड वसुल केला. त्यामुळे वणी तालुक्यातील तस्करांचे धाबे दणाणले आहे. सध्या वणी शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे केली जात असून त्यासाठी रेतीची गरज आहे. त्यातच रेती घाटांचे लिलाव अद्याप न झाल्याने स्थानिक पातळीवर चांगल्या प्रतीची रेती मिळणे कठीण झाले आहे. परिणामी बांधकामे थांबली आहेत.ही बाब हेरून चंद्रपूर जिल्ह्यातील तस्करांनी वणी शहरात रेती पुरविण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक नद्या वाहतात. यंदा चांगला पाऊस झाल्याने या नद्यांमध्ये चांगल्या प्रतीची रेती आली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तस्करीच्या वाळू तस्करीच्या धंद्यात उडी घेतली आहे. यातून हे तस्कर लाखो रूपयांची कमाई करीत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस येथील वर्धा नदीतून टिप्परद्वारे मोठ्या प्रमाणावर वणी शहरात रेती आणली जात असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार श्याम धनमने यांना मिळाल्यानंतर त्यांनी रॅपेड अ‍ॅक्शन टीम तयार केली. या टीमने शनिवारी पहाटे २.१५ वाजता सापळा रचून घुग्गूसकडून येणारा टिप्पर पकडला. या कारवाईने आता परजिल्ह्यातून येणाऱ्या रेतीला काही अंशी बे्रक लागला आहे. ही कारवाई ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना.तहसीलदार व्ही.व्ही.पवार, मंडळ अधिकारी गजानन देठे, अरूण मडावी, तलाठी दत्ता तुपे आदींनी केली.

टॅग्स :sandवाळू