शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

रेती तस्कर महसूल विभागाच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:17 IST

वणी परिसरातील नद्या व नाल्यांना पोखरून त्यातील लाखो रूपये किमतीची रेती चोरट्या मार्गाने पळविणारे तस्कर सध्या महसूल विभागाच्या रडारवर आहे. येथे नव्यानेच रूजू झालेल्या तहसीलदारांनी या तस्करांविरूद्ध कारवाईचा धडाका सुरू केला असून त्यामुळे तस्करांच्या मनात धडकी भरली आहे. या

ठळक मुद्देविशेष पथकाचे गठन : नव्या तहसीलदारांकडून कारवाईचा धडाका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी परिसरातील नद्या व नाल्यांना पोखरून त्यातील लाखो रूपये किमतीची रेती चोरट्या मार्गाने पळविणारे तस्कर सध्या महसूल विभागाच्या रडारवर आहे. येथे नव्यानेच रूजू झालेल्या तहसीलदारांनी या तस्करांविरूद्ध कारवाईचा धडाका सुरू केला असून त्यामुळे तस्करांच्या मनात धडकी भरली आहे.यापूर्वीचे तहसीलदार रवींद्र जोगी यांच्या बदलीनंतर बराच काळ तहसीलदार पद रिक्त होते. या काळात वणी तालुक्यातील रेती तस्करांनी अक्षरश: उच्छाद मांडला होता. काही महसूल कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या तस्करांनी नदी, नाल्यातील लाखो रूपयांची रेती लंपास केली.वणी तालुक्यातून निर्गुडा, वर्धा, विदर्भा या नद्यांसह अनेक मोठे नाले आहेत. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या नदी-नाल्यांमध्ये चांगल्या प्रतीची रेती आली आहे. नदीवरील रेती घाटांचा अद्याप लिलाव झाला नाही. नेमकी हीच संधी साधून तस्करांनी डोकेवर काढले. काही भ्रष्ट महसूल कर्मचाºयांना हाताशी धरून या तस्करांनी नदीचे घाट अक्षरश: कुरतडून टाकले. काही ठिकाणी जेसीबी मशिनद्वारेही उत्खनन करण्यात आले. तस्करांमुळे सर्वाधिक बाधा विदर्भा नदीला पोहोचली. वणी तहसीलदारपदी नुकतेच एस.एम.धनमने रूजू झाले. त्यांनी घेतलेल्या पहिल्या आढावा बैठकीत रेती तस्करीच मुद्दा ऐरणीवर आला. याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता, त्यांनी तातडीने एका विशेष पथकाचे गठण करून या पथकाला तस्करांविरूद्ध कारवाईचे आदेश बजावले. गेल्या काही दिवसांपासून वणी तालुक्यात या भरारी पथकाची गस्त सुरू असून आठ दिवसांमध्ये या पथकाने रेती तस्करी करणारे सहा ट्रॅक्टर व एक टिप्पर पकडून त्यांच्याकडून साडेसहा लाख रूपयांचा दंड वसुल केला. या धडक कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत व तहसीलदार एस.एम.धनमने यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार डी.एस.वासनिक, व्ही.व्ही.पवार, एस.एस.रामगुंडे व पथकातील कर्मचाºयांनी केली.

टॅग्स :sandवाळू