शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात बांधकामांना मध्य प्रदेशातील रेतीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 05:00 IST

यवतमाळ  जिल्ह्यात दोन वर्षांपासून रेती घाटांचे लिलावच झालेेले नाही. त्यामुळे शासनाचा सुमारे १०० कोटींचा महसूल बुडतो आहे. मात्र घाटांचे न झालेले लिलाव रेती तस्करांसाठी जणू पर्वणी ठरले आहेत. रेती घाटांमधून चोरट्या मार्गाने सर्रास रेतीचा उपसा व वाहतूक केली जात आहे. महसूल व पोलीस  विभागाच्या नाकावर टिच्चून रेतीची ही तस्करी केली जात आहे. रेती तस्करीत गुन्हेगारी वर्तुळातील सदस्य कमालीचे सक्रिय आहे.

ठळक मुद्देबिल्डींग व्यवसाय कोलमडला, कित्येकांवर उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  जिल्ह्यातील रेती घाटांचे  लिलावच झाले नसल्याने बांधकाम क्षेत्रावर जणू अवकळा आली आहे. हे क्षेत्र कोलमडून पडल्याचे एकूणच  चित्र आहे. सुरू असलेल्या छुटपुट बांधकामांना मध्यप्रदेशातील रेतीचा तर काही ठिकाणी चोरट्या मार्गाने घाटांमधून उपसा होणाऱ्या रेतीचा आधार घ्यावा लागत आहे. यवतमाळ  जिल्ह्यात दोन वर्षांपासून रेती घाटांचे लिलावच झालेेले नाही. त्यामुळे शासनाचा सुमारे १०० कोटींचा महसूल बुडतो आहे. मात्र घाटांचे न झालेले लिलाव रेती तस्करांसाठी जणू पर्वणी ठरले आहेत. रेती घाटांमधून चोरट्या मार्गाने सर्रास रेतीचा उपसा व वाहतूक केली जात आहे. महसूल व पोलीस  विभागाच्या नाकावर टिच्चून रेतीची ही तस्करी केली जात आहे. रेती तस्करीत गुन्हेगारी वर्तुळातील सदस्य कमालीचे सक्रिय आहे. त्यांना थेट राजकीय अभय असल्याने या रेती तस्करांवर कारवाई करणार कोण असा प्रश्न आहे. त्यामुळे या रेती चोरी व तस्करीकडे शासकीय यंत्रणेनेही डोळेझाक केल्याचे दिसते. चोरीतील हीच रेती अनेक बांधकामांवर वापरली जात आहे. प्रति ब्रास तीन हजार रुपये दराची रेती बांधकामासाठी आठ ते नऊ हजार रुपये ब्रास या दराने घ्यावी लागत आहे. बांधकामातील महत्वाचा घटक असलेली रेती उपलब्ध नसल्याने बहुतांश बांधकामे बंद आहेत. शासकीय बांधकामांना तर सोयच उरली नाही. काही बांधकामे संथगतीने सुरू आहे. काहींनी मध्यप्रदेशातून येणाऱ्या  पिवळ्या रेतीवर आपली बांधकामे चालविली आहेत. कृत्रिम रेती असली तरी त्यात डस्ट अधिक प्रमाणात राहत असल्याने व ती बांधकामात वापरण्याची अद्याप मानसिकता तयार न झाल्याने या कृत्रिम रेतीला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सर्वच आंदोलनाच्या तयारीत रेती घाटांचे लिलाव केले जावे व बांधकामांना गती येण्यास मदत व्हावी यासाठी आर्किटेक, अभियंते, कामगार, बिल्डर यांच्या संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

बिल्डींग व्यवसाय कोलमडला, कित्येकांवर उपासमार यवतमाळ शहर व  जिल्ह्यातील विकासक,  बिल्डर यांच्या व्यवसायावर अवकळा आली आहे. आधीच नोटबंदी, जीएसटी, रेरा कायदा यामुळे त्रस्त असलेल्या या क्षेत्राला आता रेतीचाही मार बसतो आहे. बांधकामे बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुशल-अकुशल कारागीरांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकामेच बंद असल्याने त्यासाठी लागणाऱ्या विविध साहित्य व उपकरणांचाही उठाव नाही. त्यामुळे त्या व्यवसायावरही मरगळ आली आहे. 

 

टॅग्स :sandवाळू