शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी आठ हजार शिक्षक यवतमाळात

By admin | Updated: August 15, 2016 01:21 IST

जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांना १७ आॅगस्ट रोजी यवतमाळात बोलावले आहे.

अविनाश साबापुरे  यवतमाळ जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शिक्षकांना १७ आॅगस्ट रोजी यवतमाळात बोलावले आहे. रविवार, स्वातंत्र्यदिन, पतेती, रक्षाबंधन अशा सलग सुट्यांचा हंगाम पाहून पर्यटनाच्या ‘मूड’मध्ये असलेल्या शिक्षकांची या आदेशाने पंचाईत झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील आठ हजार शिक्षक एकाच वेळी येणार असल्याने शिक्षण विभागाचे नियोजन कोलमडण्याचीही शक्यता आहे. शिक्षकांच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी १७ आॅगस्ट रोजी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बिंदू नामावलीची मागणी पूर्ण करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मागास प्रवर्गातून नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षक, पदवीधर शिक्षक, व उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी केली जाणार आहे. सध्या शिक्षकांना सलग सुटीची संधी मिळाली आहे. रविवारची सुटी, लगेच सोमवारी स्वातंत्र्यदिन, त्यानंतर बुधवारी पतेतीची सुटी आणि गुरुवारी रक्षाबंधनाची सुटी अशा सलग सुट्या आल्या आहेत. यात एक दोन दिवस सुटीचा अर्ज टाकून पर्यटनाचे बेत अनेकांनी आखले होते. दरम्यान, बुधवारी १७ आॅगस्ट रोजी सर्वच शिक्षकांना जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी यवतमाळात बोलावण्यात आले. त्यामुळे पर्यटनाचे बेत धुळीस मिळाले आहेत. विशेष म्हणजे, शिक्षकांनी यापूर्वीच जात प्रमाणपत्रे जिल्हा परिषदेकडे जमा केली आहेत. त्यांच्या नियुक्तीपत्राची प्रतही जिल्हा परिषदेकडेच उपलब्ध आहे. मग पुन्हा शिक्षकांना ही कागदपत्रे घेऊन का बोलवले जात आहे, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला. तसेच प्रमाणपत्र पडताळणीची ही प्रक्रिया संबंधित पंचायत समिती स्तरावर करून घेण्याची मागणीही इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशनसह विविध शिक्षक संघटनांनी केली आहे. मात्र, शिक्षण विभागाचा आदेश निर्गमित झाला असून पडताळणी शिबिरात अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांची सेवासमाप्ती करण्याचे निर्देश त्यात नमूद आहेत.