शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

मुभा मिळाल्यावरही सलून दुकाने बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST

यवतमाळ शहरातील ८६२ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २२४८ सलून दुकाने रविवारी परवानगी असतानाही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून बंद ठेवण्यात आली. केवळ कटिंग करण्याच्या सूचना आहे. दाढी केली तर दहा हजारांचा दंड आहे. अशा स्थितीत राज्य शासनाने चुकीचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यावसायिकांनी राज्य शासनाला ५ जुलैचा अल्टीमेटम दिला.

ठळक मुद्देदाढीवरील बंदीने संताप : ५ जुलैपर्यंत सुधारित निर्णयाची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे दुकान असूनही बेरोजगारी भोगलेल्या सलून व्यावसायिकांना रविवारपासून दुकान उघडण्याची परवानगी मिळाली. मात्र त्यात केवळ कटिंग करावी, दाढी करू नये अशी अट घातल्याने ही परवानगी व्यवसायाच्या दृष्टीने अधरकच्ची ठरली. या विरोधात जिल्ह्यातील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेऊन संताप व्यक्त केला.यवतमाळ शहरातील ८६२ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २२४८ सलून दुकाने रविवारी परवानगी असतानाही प्रतिकात्मक आंदोलन म्हणून बंद ठेवण्यात आली. केवळ कटिंग करण्याच्या सूचना आहे. दाढी केली तर दहा हजारांचा दंड आहे. अशा स्थितीत राज्य शासनाने चुकीचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यावसायिकांनी राज्य शासनाला ५ जुलैचा अल्टीमेटम दिला. पूर्ण दुकाने उघडू द्या अथवा आर्थिक मदत द्या, अशी मागणी केली.कुठलाही ग्राहक कटिंगसाठी महिन्यात एकच वेळा येतो. दाढी करणारे ग्राहक नियमित असतात. दुकानात सर्वाधिक ग्राहक दाढीचेच असतात. मात्र त्यावरच बंदी आहे.तीन महिन्यापासून दुकाने बंद असल्याने वीजबिल थकले आहे. दुकानभाडे थकले आहे. हे पैसे द्यायचे कसे, असा प्रश्न सलून व्यावसायिकांपुढे आहे. घरभाडे, दुकानभाडे, वीजबिल माफ करण्यात यावे. दुकानदारांना कुटुंब चालविण्यासाठी दहा हजारांची मदत देण्यात यावी, अशा मागण्या व्यावसायिकांनी केल्या आहे. अन्यथा पूर्ण दुकाने उघडू द्या, अशीही मागणी रेटून धरली आहे.राज्य शासनाला सलून दुकानदारांनी फेरविचारासाठी ५ जुलैचा अल्टीमेटम दिला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय मादेशवार, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप शिंदे, जिल्हा सचिव संतोष मोतेवार, कोषाध्यक्ष आदेश पेल्लेवार, संघटक सचिन पापळकर, सहसचिव गजानन दुल्लरवार, रमेश अतकर, योगेश रेक्कलवार, अतुल गड्डमवार आदींनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.केवळ पुसद शहरात दुकाने उघडलीसलून व्यावसायिकांनी रविवारपासून जिल्हाभर बंद पुकारलेला असताना पुसदमधील सलून व्यावसायिकांनी मात्र रविवारी आपली दुकाने उघडली होती. विशेष म्हणजे, मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड अशी साधने वापरून ग्राहकांची कटिंग करण्यात आली. मात्र पुसद वगळता सर्वत्र सलून दुकाने बंद होती. यवतमाळ जिल्ह्यातील तीन हजार व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या