शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळच्या संमेलनात चार कोटींच्या पुस्तकांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 13:47 IST

९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक विक्रीने बडोद्याच्या ९१ व्या संमेलनाचा विक्रम मोडीत काढला. बडोद्यात चार कोटींची पुस्तके विकली गेली होती.

ठळक मुद्देबडोद्याचा विक्रम मोडलास्पर्धा परीक्षेची पुस्तके, कादंबऱ्या अन् बालसाहित्याला प्रतिसाद

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील पुस्तक विक्रीने बडोद्याच्या ९१ व्या संमेलनाचा विक्रम मोडीत काढला. बडोद्यात चार कोटींची पुस्तके विकली गेली होती. यवतमाळच्या संमेलनाने चार कोटींचा आकडा पार केला आहे. विशेष म्हणजे, पुस्तक विक्रेत्यांनाही विक्रमी विक्री होईल, असे वाटले नव्हते. त्यामुळे अनेक लेखकांची पुस्तके एकदा संपल्यानंतर पुन्हा मिळाली नाहीत.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर काही साहित्यिकांनी बहिष्कार टाकल्याने पुस्तकप्रेमी येणार किंवा नाही, असा संशय प्रकाशकांना वाटला. प्रत्यक्षात शेवटच्या दिवसापर्यंत संमेलनस्थळी अलोट गर्दी होती. या गर्दीमधील अनेक अभ्यासू मंडळींनी पुस्तके खरेदी केली. पुस्तक विक्रीचे २१४ स्टॉल या ठिकाणी होते. यामधून चार कोटी रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली आहे. ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात २५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

अरुणा ढेरेंच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणीसंमेलनात सर्वच प्रकारची पुस्तके विकल्या गेली. विशेषत: संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांच्या पुस्तकांना सर्वाधिक मागणी होती. यामध्ये कृष्ण किनारा, प्रेमाकडून प्रेमाकडे, मैत्रही अशी ४० प्रकारची पुस्तके होती. सिंधुताई सपकाळांचे अनाथांची आई नावाचे पुस्तक सर्वाधिक विकले गेले. मृत्यंूजय, छावा, ययाती, ज्ञानेश्वरी, दिव्य पुराण, चार वेद या पुस्तकांसह कादंबºयांचीही विक्री मोठ्या प्रमाणात झाली.बाल साहित्याचे स्वतंत्र दालनग. दिं. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने साहित्य संमेलनात स्वतंत्र दालन होते. तसेच बाल साहित्याचेही स्वतंत्र दालन होते. त्यामुळे खरेदीत मोठी वाढ नोंदवली गेली. शैक्षणिक पुस्तके, स्पर्धा परीक्षा आणि थोर पुरूषांच्या पुस्तकांनाही संमेलनस्थळी मोठी होती, अशी माहिती ग्रंथप्रदर्शनी समिती प्रमुख सुधीर नारखेडे यांनी ‘लोकमत’ला दिली.भाऊसाहेब पाटणकरांची पुस्तके संपलीसंमेलनस्थळी भाऊसाहेब पाटणकरांची पुस्तके लवकर संपली. नंतर येणाºया वाचकांना ही पुस्तके मिळाली नाही. या पुस्तकांसाठी अनेक ग्राहकांनी संमेलन पालथे घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.पुस्तकांच्या दालनात सर्वाधिक गर्दी होती. चार कोटींची पुस्तके विकली गेली. साहित्य संमेलनात दर्जेदार पुस्तकांचा खजिना असल्याने वाचकांनाही लाभ घेता आला. यवतमाळात नवोदित वाचकांची संख्या वाढत आहे.- प्रा. घनश्याम दरणेसंमेलन कार्यवाह, यवतमाळ

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन