शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आम्हाला चोर समजता काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:18 IST

घाटंजी : साहेब, आम्ही शेतकरी आहोत. आम्हाला चोर समजता काय ?, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी नाफेड तूर खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या पथकाला केला. शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून चौकशी अधिकाऱ्यांनी आम्ही वरिष्ठांचे आदेश पार पाडत आहोत, असे सांगत आपली सुटका करून घेतली. घाटंजी बाजार समितीत तूर खरेदी प्रकरणी ३०८ शेतकऱ्यांना नोटीस ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : तूर खरेदी प्रकरणात घाटंजीतील ३०८ जणांना नोटीस

घाटंजी : साहेब, आम्ही शेतकरी आहोत. आम्हाला चोर समजता काय ?, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी नाफेड तूर खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या पथकाला केला. शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून चौकशी अधिकाऱ्यांनी आम्ही वरिष्ठांचे आदेश पार पाडत आहोत, असे सांगत आपली सुटका करून घेतली. घाटंजी बाजार समितीत तूर खरेदी प्रकरणी ३०८ शेतकऱ्यांना नोटीस दिल्याने तालुक्यात असंतोष पसरला आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गतवर्षी शासनाने नाफेडच्या माध्यमातून तूर खरेदी केली. या खरेदीत गैरप्रकार झाला असून प्रतीक्षा यादीत नावे नसणाºया शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली. ही तूर शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची याची चौकशी होईपर्यंत देयके थांबवावी अशी तक्रार बाजार समितीचे माजी संचालक सैयद रफीक स.महेमुद यांनी ६ सप्टेबर २०१७ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीवरून चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय पथक गुरुवारी येथील बाजार समितीत आले.या पथकाने ३०८ शेतकऱ्यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्या होत्या. पथकासमोर उपस्थित झालेल्या शेतकऱ्यांनी चौकशी अधिकाºयांवरच प्रश्नांचा भडीमार केला. ‘आम्हाला चोर समजता काय’ अशी आक्रमक भूमिक घेतली. आजची आमची बुडालेली मजुरी, येण्या-जाण्याचा खर्च द्या, नंतर बयाण नोंदवा नाही, तर खर्च तक्रारदारांकडून वसूल करा, आम्हाला नाहक त्रास देऊ नका असे त्यांनी सांगितले. आम्हाला नोटीस देऊन येथे बोलावले, आम्ही आलो, तक्रारकर्ते का आले नाही, असा सवालही यावेळी शेतकºयांनी केला.शेतकऱ्यांचा संताप पाहून अखेर चौकशी अधिकारीही नरमले. त्यांनी आम्ही केवळ आदेश पाळत असल्याचे सांगून कशीबशी आपली सुटका करवून घेतल्याने अनर्थ टळला.