शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सागवानाची तेलंगणात तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:42 IST

तालुक्यात मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी होत आहे. पांढरकवडा तालुका हा चारही बाजूंनी जंगलाने व्यापलेला तालुका असून याच तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यसुद्धा आहे.

ठळक मुद्देरात्री अवैध वृक्षतोड : गस्तीच्या नावावर केवळ फेरफटका

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी होत आहे.पांढरकवडा तालुका हा चारही बाजूंनी जंगलाने व्यापलेला तालुका असून याच तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यसुद्धा आहे. या जंगलात सागवानासह विविध मौल्यवान वृक्ष आहेत. सध्या तेलंगणातील तस्करांचा या वनसंपदेवर डोळा असून या तस्करीला स्थानिकांचा हातभार लागत आहे. ही तस्कर मंडळी स्थानिकंच्या मदतीने रात्रीच्यावेळी मोठमोठ्या सागवान वृक्षाची कत्तल करतात व रातोरात तेलंगणा राज्यात वाहनांद्वारे हे मौल्यवान लाकुड सीमापार करतात. वाहन सीमापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण होते. अनेक तस्करांजवळ स्वयंचलित आरामशीन असून या आरामशिनद्वारे अवघ्या काही मिनीटताच सागवानाचे मोठे झाडही कापल्या जाते. या सागवानाचे तुकडे करून वाहनात भरून त्यावर गौण खनिज अथवा वैरण किंवा खाली बारदाणा टाकून तेलंगणात नेले जाते. मध्यंतरी दोन सागवान तस्करांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर सागवान जप्त करण्यात आले होते. परंतु नंतर या प्रकरणाचे काय झाले, याबाबत काहीही समजले नाही.एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्याच्या विविध योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे सागवान तस्कर अवैधरितीने मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करीत आहे. या वृक्षतोडीमुळे वनसंपदा नष्ट होत आहे.अनेकदा हे सागवान तस्कर सागवान तोडीच्या नावाखाली वन्यप्राण्यांची शिकारदेखिल करतात. जंगलात कुणीही फेरफटका मारला असता, सागवान झाडाची कत्तल झाल्याचे दिसून येते. सागवानाची तुटलेली थुटे दिसून येते. पंरतु वनविभागाला ही वृक्षतोड दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सर्रास सुरू आहे. परंतु याकडे वनविभाग लक्ष द्यायला तयार नाही. वृक्षप्रेमी व वन्यप्रेमी म्हणून स्वत:चा उदोउदो करणारेही या वृक्षतोडीबाबत चुप्पी साधून आहे. केवळ वृक्षारोपणाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविणाऱ्या या स्वयंघोषित वृक्षप्रेमींनी व वन्यप्रेमी मंडळींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.तपासणी नाके केवळ फार्ससागवान तस्करीला आळा घालण्यासाठी वनविभागाने ठिकठिकाणी वनउपज तपासणी नाके उभारले आहेत. परंतु हे नाके केवळ शोभेसाठी बनले की काय, असा प्रश्न निर्माण होतो. काही अपवाद जर सोडला, तर या नाक्यावर रात्रीच्यावेळी एकही कर्मचारी दिसत नाही. याच संधीच लाभ घेत तस्कर कटाई केलेला सागवान माल वाहनाद्वारे नेत आहे. वनअधिकारी, कर्मचाºयांचे साटेलोटे असल्यामुळेच हे शक्य असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :forestजंगल