शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण महिला मजूर अडकत आहेत मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:56 IST

Yavatmal : हप्ता चुकला की भरावा लागतो दंड

लोकमत न्यूज नेटवर्क मारेगाव : ग्रामीण भागातील महिला मजुरांना वित्तीय पुरवठा करणाऱ्या छोट्या वित्तीय संस्था मागील दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील महिला मजूर या मायक्रो फायनान्सच्या जाळ्यात अडकल्या आहेत.

दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल होत असून, अनेक महिला कर्जबाजारी होत आहेत. या मायक्रो फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी गावागावात जाऊन आठ दहा महिलांचा गट बनवून सुरुवातीला प्रतिमहिला ३० हजार रुपयांचे कर्ज देतात. नंतर गटाचा सिबिल कोअर चांगला असल्यास कर्जाची रक्कम वाढविली जाते. या कर्जाची परतफेड दर आठवड्याला करावी लागते. आठवड्याच्या ठरावीक दिवशी मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी एका विशिष्ट ठिकाणी बसून कर्जाची वसुली करतात. ग्रामीण भागातील मजूर महिलांना नियमित मजुरी मिळत नाही. 

यामुळे संसार चालवताना आर्थिक अडचणी येतात. मायक्रो फायनान्स कंपनी कर्जाची एकदम रक्कम देत असून, थोड्या थोड्या रकमेने वसूल करते. परंतु, फायनान्सचा हप्ता चुकविता येत नसल्याने हप्ता भरण्याकरिता काही महिलांची चांगलीच तारांबळ उडते. बरेचदा या महिलांना खासगी सावकाराचे कर्ज काढून हप्ता भरावा लागतो. त्यामुळे एका कर्जावर दोनदा व्याज भरणा करण्याची वेळ या महिलांवर येत आहे.

हप्ता चुकला की दंड मायक्रो फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाचा हप्ता चुकविता येणार नाही, असा दंडक आहे. ग्रुपमधील एखाद्या महिलेने कर्जाचा हप्ता चुकवला तर ग्रुपमधील इतर सर्व महिलांनी मिळून त्या महिलेचा कर्जाचा हप्ता भरावा लागतो. अशावेळी ज्या महिलेने हप्ता भरला नाही. त्या महिलेस दंड भरावा लागतो.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रRural Developmentग्रामीण विकासWomenमहिलाYavatmalयवतमाळ