शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

५७ कोटींच्या वसुलीसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

औद्योगिक ग्राहकाकडे नऊ कोटी ९२ लाख थकले आहे. ग्राहकांकडे तीन कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्याने याची थकबाकी ३६३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. तर शासकीय कार्यालयाकडे एक कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीने कंपनी चिंते सापडली आहे. त्यांनी थेट कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. यातूनच ढाणकीमध्ये खंब्यावर बसवलेले स्ट्रीट लाईट काढून  घेतले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज वितरण कंपनीने विविध भागामध्ये वसुलीच्या मोहिमेला प्रारंभ केला आहे. यातून वीज बिल वसुली वाढली आहे. मात्र काही ठिकाणी अतिरेक झाल्याने नागरिकांकडून ओरडही हाेत आहे. कंपनीचे विविध ग्राहकांकडे ५७ कोटी ३१ लाख रुपयांचे वीज बिल थकले आहे. त्यामध्ये घरगुती ग्राहकांकडे १४ कोटी ५८ लाख थकले आहे. याशिवाय औद्योगिक ग्राहकाकडे नऊ कोटी ९२ लाख थकले आहे. ग्राहकांकडे तीन कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. स्ट्रीट लाईटचे वीज बिल न भरल्याने याची थकबाकी ३६३ कोटींच्या घरात पोहोचली आहे. तर शासकीय कार्यालयाकडे एक कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वाढत्या थकबाकीने कंपनी चिंते सापडली आहे. त्यांनी थेट कारवाईसाठी पाऊल उचलले आहे. यातूनच ढाणकीमध्ये खंब्यावर बसवलेले स्ट्रीट लाईट काढून  घेतले आहे. 

शासकीय कार्यालयाने चिंता वाढविली- शासकीय कार्यालयांना प्रत्येक गोष्टीच्या पूर्ततेसाठी निधी वळता केला जातो. यानंतरही या कार्यालयाकडे वीज बिलाची थकबाकी पाहायला मिळत आहे. तब्बल दीड कोटी या कार्यालयांकडे थकले आहे.

अनेकांवर दंड आकारला

वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलाची वसुली करताना वीज कनेक्शन कापले आहे. यात मोठा दंडही केला आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहे. ढाणकी नगरपंचायतीमध्ये गावातले स्ट्रिट लाईटच वीज कंपनीने काढून नेले आहे. गाव अंधारात बुडाले आहे.

४२६० थकबाकीदारांची वीज कापलीगत तीन महिन्यांमध्ये वीज वितरण कंपनीने चार हजार २६० ग्राहकांकडील वीज कापली आहे. या ठिकाणी वारंवार सूचना दिल्यानंतरही थकीत बिलाचे पैसे मिळाले नाही. यामुळे वीज कंपनीने अखेरची कारवाई म्हणून हे पाऊल उचलले आहे. यामुळे चिंता वाढली आहे. 

सर्वसामान्य काय म्हणतात

आजपर्यंत आमच्यावर साडेचार कोटी रुपयांचे वीज बिल थकले. मात्र नगरपंचायत आल्यापासून नियमित परतफेड होत आहे. यानंतरही स्ट्रिट लाईट काढले.- संतोष पुरी, नगरसेवक

लाईन नसेल तर शेती करणे अशक्य आहे. भर उन्हात पीक करपत आहे. अशा परिस्थितीत त्याला वीज प्रवाह मिळाला नाही तर हाती आलेले पीकही वाया जाते. - जगदीश चव्हाण, शेतकरी 

दोन बिले थकली तर वीज कापणार वीज कपंनीने वीज वसुलीसाठी काही नियम तयार केले आहे. त्याचप्रमाणे वीज बिल जर थकले तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दोन बिलांचा अवधी देण्यात आला आहे. 

 

टॅग्स :electricityवीज