शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रिव्हॉल्वरच्या धाकावर गुंडांचा धुडगूस

By admin | Updated: June 24, 2016 02:35 IST

गृह राज्यमंत्री शहरात आणि पोलीस महानिरीक्षक जिल्ह्यात असताना गुंडांनी यवतमाळात भरदिवसा रिव्हॉल्वरच्या धाकावर सशस्त्र धुमाकूळ घातला.

घरात घुसून दागिने लुटले : ज्वेलर्स फोडले, बसस्थानकावर दीड लाख उडविले, सात लाखांचे बल्ब चोरीयवतमाळ : गृह राज्यमंत्री शहरात आणि पोलीस महानिरीक्षक जिल्ह्यात असताना गुंडांनी यवतमाळात भरदिवसा रिव्हॉल्वरच्या धाकावर सशस्त्र धुमाकूळ घातला. घरात शिरुन महिलेच्या अंगावरील दागिने या गुंडांनी लुटून नेले. एवढेच नव्हे तर शस्त्राचा धाक दाखवित आणि पाठलाग करणाऱ्यांवर रिव्हॉल्वर रोखत सर्वांच्या डोळ्यादेखत हे गुंड पसार झाले. या घटनेने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुंडांनी गेल्या २४ तासात शहरात अक्षशर: धुमाकूळ घातला आहे. वाघापूर रोडवरील ज्वेलर्स फोडून दीड किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली. यवतमाळच्या बसस्थानकावर बॅगला चिरा मारुन दीड लाखांची रोकड बुधवारी सायंकाळी लंपास करण्यात आली. आर्णी रोडवरील गोदामातून तब्बल ६ लाख ८५ हजारांचे लिड बल्ब चोरुन नेण्यात आले. एका पाठोपाठ घडलेल्या या गुन्ह्यांच्या मालिकेने पोलिसांची झोप उडविली आहे. स्थानिक शिवाजीनगरात केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा टॉप फार्मा या होलसेल औषध फर्मचे संचालक पंकज नानवाणी यांचे घर आहे. गुरुवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मोटरसायकलवरून तीन जण त्यांच्या घरी आले. त्यापैकी दोघांनी तोंडाला कापडाने झाकले होते. त्यांनी समोर अभ्यास करीत असलेल्या सारांश (१२) याला ‘अंकल है क्या’ अशी विचारणा केली. तो आईला बोलविण्यासाठी घरात शिरताच दोन जण आत शिरले. त्यांनी तेथे झोपलेल्या मंत्राबाई नानवाणी (६०) यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाची चेन हिसकाविली. त्यानंतर ते घराबाहेर पडले. दरम्यान हा प्रकार पाहून अलर्ट झालेला सारांश मागच्या दाराने घराबाहेर पडला व शेजारीच राहणाऱ्या आपल्या मोठ्या आईला बोलविण्यासाठी गेला. मात्र ती मंडळी येईपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. आरडाओरड ऐकून शेजारील चार युवकांनी या दरोडेखोरांंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी चाकूचा धाक दाखविला. तरीही पाठलाग सुरूच असल्याचे पाहून या दरोडेखोरांनी रिव्हॉल्वर रोखले. त्यामुळे पाठलाग करणाऱ्यांना जीवाच्या भीतीने जागीच थांबावे लागले. सत्यसाई ज्योत मंगल कार्यालयाकडून आलेले हे लुटारू केमिस्ट भवन समोरुन पसार झाले. त्यांच्या मोटरसायकलचा क्रमांक (एम.एच-२९-वाय-१४३८) पोलिसांना मिळाला असला तरी तो बनावट असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, वडगाव रोडचे ठाणेदार ढोले घटनास्थळी दाखल झाले. नानवाणी यांच्या आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कुणी कैद झाले का याचा शोध घेतला जात आहे. तीन पैकी एका युवकाचा चेहरा सारांशने पाहिला. त्यामुळे त्याच्याकडून माहिती घेऊन त्या संशयिताचे रेखाचित्र बनविण्याची तयारी पोलीस ठाण्यात सुरू आहे. या घटनेने पोलीस दल व नागरिकात खळबळ निर्माण झाली आहे. दीड किलो चांदी लंपास गेल्या २४ तासात गुन्हेगारांनी धुडगुस घालत लाखोंच्या ऐवजावर हात साफ केला आहे. विसावा कॉलनी येथील दीपक देवगिरकर यांचे वाघापूर नाका रोड स्थित गिरीनगर येथे ज्वेलर्स आहे. रात्री हे दुकान फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपयांचे दीड किलो चांदी व पाच हजारांचे बेन्टेक्स दागिने लंपास केले. श्वान पथकाला पाचारण केले होते. दारव्ह्याच्या व्यापाऱ्याला फटकालुटीची आणखी एक घटना यवतमाळ मध्यवर्ती बसस्थानकावर घडली. दारव्हा येथील खाटीकपुरा भागात राहणाऱ्या जुनेद अहमद खान इकबाल अहेमद खान (४०) यांनी बुधवारी सायंकाळी स्थानिक गांधी चौकातील बँकेतून दीड लाख रुपयांचा विड्रॉल केला. ही रक्कम बॅगमध्ये घेऊन ते दारव्हा येथे जाण्यासाठी सायंकाळी ७.३० वाजता यवतमाळ बसस्थानकावरून एसटीमध्ये बसले असता त्यांच्या या बॅगला चिरा मारुन दीड लाखांची रोकड लंपास करण्यात आली. आर्णी रोडवरील गोदामात चोरी नवी दिल्लीच्या स्पॅन कम्युनिकेशन कंपनीचे आर्णी रोडवरील बिछायत केंद्रानजीक गोदाम आहे. या गोदामातून सहा लाख ८५ हजार ९०० रुपये किंमतीचे सहा हजार ८५९ लिड बल्ब चोरीला गेले. कंपनीचे विभागीय व्यवस्थापक आतिश मनोहर पाटील यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. गोदाम प्रभारी धीरज गेडाम याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. त्याने दोन हजार बल्ब विकल्याचे कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी) गुन्ह्यांच्या मालिकेने यवतमाळ शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात गृहराज्यमंत्र्यांची भेट भरदिवसा रिव्हॉल्वरच्या धाकावर लुटल्याच्या घटनेची माहिती मिळताच गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी पंकज नानवाणी यांच्या घरी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. महानिरीक्षकांकडून आढावाअमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल यांनी गुरुवारी सायंकाळी गुन्हे आढावा बैठक घेतली. त्यात गुन्ह्यांची मालिका, अग्नी शस्त्रांचा वाढलेला वापर, थंडावलेले डिटेक्शन यावर झाडाझडती घेण्यात आली. पोलीस ठाण्यांचे जुने रेकॉर्डही मागण्यात आले होते.