शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

४५ हजार हेक्टरवरील कपाशी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:01 IST

यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देशेतकरी देशोधडीला : मदतीची प्रतीक्षा, नव्या हंगामासाठी पैैशाची जुळवाजुळव

आॅनलाईन लोकमतवणी : यंदा कपाशीवर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने वणी तालुक्यातील ४५ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शासनस्तरावर बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याच्या गप्पा सुरू असल्या तरी प्रत्यक्षात ती मदत शेतकऱ्यांपर्यंत केव्हा पोहचेल, याबाबत संभ्रम आहे.यासंदर्भात महसूल मंत्र्यांनी मंगळवारी घोषणा केली. एनडीआरएफमार्फत बोंडअळीग्रस्त शेताची पाहणी करून त्यानंतर शेतकºयांना मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले. मात्र या मदतीला ‘कर्जमाफी’चे स्वरूप तर येणार नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. शासनाने शेतकºयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली. मात्र अद्याप प्रत्यक्षात एक खडकूही शेतकºयांच्या कर्जखात्यात जमा झाला नाही, हे विशेष. यंदा बोंडअळीच्या संकटाने शेतकरी देशोधडीला लागला आहे.वणीसह झरी, मारेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे उत्पन्न घेतले जाते. त्यात बिटी बियाणांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदा वणी तालुक्यात ४५ हजार ८०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र कधी नव्हे ईतका बोंडअळीचा प्रकोप झाल्याने एका वेचणीनंतरच कपाशी उद्ध्वस्त झाली. दरवर्षी फेबु्रवारीपर्यंत शेतात कापसाची झाडे उभी असतात.यादरम्यान, दहापेक्षा अधिक कापूस वेचण्या होतात. मात्र यावर्षी एका कापूस वेचणीनंतरच सर्वच कापूस बोंडांना गुलाबी बोंडअळीने पोखरून टाकले. विशेष म्हणजे ही अळी बोंडात शिरून स्वत:च्या विष्ठेने बोंडाची सुक्ष्म छित्रे बंद करते. त्यामुळे बोंडावर कोणत्याही औैषधांची फवारणी केली तरी त्याचा परिणाम अळीवर होत नाही. कृषी विभागाकडून वारंवार फवारणीचा सल्ला देण्यात आला. मात्र ही फवारणी कुचकामी ठरली. ही अळी सहा महिन्यांपर्यंत कोष करून त्यात जीवंत राहू शकते. त्यामुळे कपाशीची झाडे जाळून टाकण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. त्यामुळे बोंडअळीचा नायनाट होईल, असा दावा केला जात आहे.कपाशीवर नांगर फिरवून रबीची तयारीकपाशीचे पीक हातून गेल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशीवर नांगर फिरविले आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, त्या शेतकºयांनी रबी हंगामासाठी मशागत सुरू केली आहे. मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, अशा शेतकऱ्यांचे शेत मात्र खरीप हंगामापर्यंत मोकळे राहणार आहे. एकूणच यावर्षी आलेल्या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कपाशीचे उत्पादनही निम्म्यापेक्षाही कमी झाल्याने, कर्जाची परतफेड कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांना छळत आहे.