शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन एटीएम फोडून पळविले 21 लाख रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

हिवरासंगम येथील मुख्य बाजारपेठेत हिताशी कंपनीचे एटीएम आहे. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एटीएमचे शटर वाकवून चोरट्यांनी उघडले. नंतर गॅस कटरने मशीनचे लॉकर कापले. यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला व एक लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर १.५० ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली. अवघ्या दहा मिनिटांत चोरट्यांनी एटीएम मशीन रोख काढली.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी/हिवरासंगम : अनेक सुरक्षा साधने लावलेले एटीएम मशीन चोरट्यांकडून सराईतपणे फोडले जात आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास तासाभराच्या अंतरात दोन एटीएम फोडून चोरट्यांनी २१ लाख रोख रक्कम पळविली. गेल्या काही दिवसांपासून महागाव परिसरासह नागपूर, बोरी, तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेले एटीएम चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. हिवरासंगम व आर्णी येथील घटनेमुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे.  हिवरासंगम येथील मुख्य बाजारपेठेत हिताशी कंपनीचे एटीएम आहे. बसस्थानकापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या एटीएमचे शटर वाकवून चोरट्यांनी उघडले. नंतर गॅस कटरने मशीनचे लॉकर कापले. यापूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला व एक लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर १.५० ते २ वाजण्याच्या दरम्यान घडली. अवघ्या दहा मिनिटांत चोरट्यांनी एटीएम मशीन रोख काढली. जाताना एटीएमचे शटर बंद केले. त्यामुळे ही घटना सकाळी नऊ९ वाजेपर्यंत उघडकीस आली नाही. हिवरा संगम बसस्थानक परिसरात पुसद, माहूर रोडवर पांढऱ्या रंगाची कार जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळली आहे. पोलीस तिचा शोध घेत आहे. हिवरासंगमची घटना घडल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांतच २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या आर्णी येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यात आले. येथेही चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे फवारला. त्यामुळे घटनाक्रम कॅमेऱ्यात आला नाही. चोरट्यांनी गॅसकटरचा वापर करीत एटीएमचे लॉकर तोडले. या दोन्ही एटीएमवर सुरक्षा रक्षक तैनात नव्हता व आलाराम सुविधाही उपलब्ध नव्हती. त्यामुळे गॅस कटरने एटीएमचे लॉकर तोडत असतानाही कुठलाही आवाज आला नाही. आर्णीतील एटीएममधून २० लाख ४३ हजारांची रोख चोरट्यांनी काढून घेतली. २.४५ वाजता पैसे घेऊन ते पसार झाले. हा प्रकार गुरुवारी सकाळी लक्षात आला. त्यानंतर याची माहिती मनोज वसंत जाधव यांनी आर्णी पोलिसांना दिली. तहसील चौकातील मुख्य मार्गावरचे एटीएम फोडल्याने येथील व्यापारी वर्गाला मोठा धक्का बसला आहे. हा रस्ता वर्दळीचा असतानाही चोरीचा प्रकार कोणाच्याच  निदर्शनास आला नाही. या दोन्ही घटनास्थळाला पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर, सायबर सेल टीम, श्वानपथक, ठसे तज्ज्ञांची चमू यांनी भेट दिली. आर्णी येथे श्वानाला कुठलाच सुगावा मिळाला नाही. हिवरासंगम येथे मात्र श्वानाने बसस्थानकापर्यंत चोरट्यांचा माग दाखविला. नंतर ते घुटमळले. चोरटे वाहनाने पसार झाल्याने श्वानाला पुढील माग दिसला नाही. आर्णी व महागाव पोलीस ठाण्यांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

 परप्रांतीय टोळीसह मराठवाड्यावर लक्ष 

- एटीएम फोडणाऱ्या टोळ्यांच्या गुन्ह्याची पद्धत पाहून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली आहे. पंजाब, राजस्थान, हरियाणा या राज्यांतील टोळ्यावर लक्ष केंद्रित केले आहे, तर मराठवाड्यातील परभणीमध्ये नव्यानेच तयार झालेल्या अशा टोळ्यांच्या कारवायांचा अभ्यास करून शोध घेतला जात आहे. त्यामुळे लवकरच टोळीचा छडा लागण्याची शक्यता आहे. 

टोल नाक्यावरचे सीसीटीव्ही आधार- यापूर्वी पोलिसांनी टोल नाक्यावरील सीसीटीव्हीचा आधार घेऊन परप्रांतीय टोळीला जेरबंद केले होते. आताही नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहे. दोन्ही घटनाक्रमानंतर चोरटे नागपूरकडे पसार झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. 

- सतत एटीएम फोडण्याच्या घटना घडत असल्याने सर्वसामान्य माणसांचा पैसा असुरक्षित झाला आहे. बॅंकांनाही फटका बसत आहे.  

टॅग्स :atmएटीएमThiefचोर