शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

रोहयोच्या कामांचे वाजले तीनतेरा

By admin | Updated: October 14, 2015 02:56 IST

दारव्हा तालुक्यातील महागाव (कसबा) जिल्हा परिषद गटामध्ये सध्या रोहयो कामाचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे.

महागाव (कसबा) : दारव्हा तालुक्यातील महागाव (कसबा) जिल्हा परिषद गटामध्ये सध्या रोहयो कामाचे तीनतेरा वाजल्याचे दिसत आहे. अधिकारी, पदाधिकारी नियमांना बगल देऊन ही योजना कुचकामी ठरवित आहे. गरिबांना रोजगाराची हमी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेमध्ये १०० टक्के मजुरांना काम मिळावे म्हणून सिंचन विहिरी, तलाव, शेततळे, पांदण रस्ते आदी कामे केली जातात. पण या योजनेचा रोजमजुरांऐवजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनाच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. मजुरांना कामे देण्याऐवजी अधिकारी व पदाधिकारीच योजना हडप करीत असल्याचे बोलले जात आहे. अनेक गावांमध्ये पांदण रस्ते अर्धवट अवस्थेत पडून आहेत. त्या रस्त्यावरून माणसाला चालणे कठीण होत आहे. काही पांदण रस्त्यांचे काम तर सुरू झाले. मात्र हे काम पूर्णत्वास नेण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. परंतु संपूर्ण काम झाल्याचे दाखवून बिल वसूल केले जात आहे. पांदण रस्ते, विहिरी, शेततळे अशी कामे या योजनेंतर्गत मजुरांकडून करून घेणे बंधनकारक आहे. पण अधिकारी बरीच कामे यंत्राद्वारे करण्याकडे भर देतात. या योजनेतील अनेक कामे नियमबाह्य पद्धतीने झाली असून शासनाच्या निधीची वाट लावली जात आहे. वरिष्ठांनी कामाची पाहणी करावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)