शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

रोहिणी-मृगाचा दगा, आर्द्राची आशा

By admin | Updated: June 21, 2014 02:07 IST

रोहिणी, मृग नक्षत्राने दगा दिल्यानंतर २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आद्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळरोहिणी, मृग नक्षत्राने दगा दिल्यानंतर २२ जूनपासून सुरू होणाऱ्या आद्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ सहा टक्के पाऊस झाल्याने पेरण्याही ठप्प आहे. विशेष म्हणजे गतवर्षी जून महिन्यात ११ दिवसात ३४८ मिमी पाऊस कोसळला होता आणि ४१ टक्के पेरण्याही पूर्ण झाल्या होत्या. यावर्षी शेतकऱ्यांना आकाशाकडे डोळे लावून बसण्याची वेळ आली आहे. अद्यापही मान्सून सक्रिय झाला नसल्याने जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस झाला नाही. रोहिणी नक्षत्राला २५ मे रोजी प्रारंभ झाला. मात्र आकाशात ढगच दिसत नव्हते. त्यानंतर शेतकऱ्यांना आशा होती ती मृग नक्षत्राची. ८ जून रोजी मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. अपवाद वगळता संपूर्ण नक्षत्रात आकाश निरभ्र राहिले. आता शनिवार २१ जून रोजी मृग नक्षत्र संपत आहे. गेल्या कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात मृगाचा दमदार पाऊस बरसला नाही. आजही उन्हाळ्यासारखी ऊन तापत आहे.विशेष म्हणजे यावर्षी मृग नक्षत्राचे वाहन हत्ती आहे. हत्ता वाहन असलेल्या मृगात जोरदार पाऊस बरसतो, असे जाणकार सांगतात. मात्र यावर्षी मृगाचे वाहन असलेल्या हत्तीने शेतकऱ्यांना पायी तुडविल्याचे दिसत आहे. मृग नक्षत्र २१ जून रोजी संपत असून २२ जूनपासून आद्रा नक्षत्राला प्रारंभ होत आहे. रोहिणी आणि मृगाने दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांची आशा या नक्षत्रावर लागून आहे. पुणे-मुंबईपर्यंत धडकलेला मान्सून विदर्भात मात्र सक्रिय नाही. वातावरणात बदल जाणवत असून वेगाने वाहनारे वारे आणि वातावरणात वाढलेली आद्रता पावसाची लक्षणे सांगत आहे. त्यामुळे आद्रा नक्षत्रात निश्चितच पाऊस बरसेल, अशी आशा आहे.