शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राजस्थानी सावकारांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 10:33 PM

शेतपिकावर आलेल्या विविध संकटांमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले असून त्याचाच फायदा घेत वणी उपविभागातील ग्रामीण भागात राजस्थानी सावकारांनी आपले जाळे विणले आहे.

ठळक मुद्देवणी उपविभाग : आंध्रातील सावकारांची दंडेली, प्रशासन अनभिज्ञ

ऑनलाईन लोकमतवणी : शेतपिकावर आलेल्या विविध संकटांमुळे ग्रामीण भागातील अर्थचक्र मंदावले असून त्याचाच फायदा घेत वणी उपविभागातील ग्रामीण भागात राजस्थानी सावकारांनी आपले जाळे विणले आहे. या परिसरात अनेक वर्षांपासून आंध्रातील सावकारांचीही दंडेली सुरू आहे. अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारून ग्रामीणांना लुटले जात आहे.गेल्या दोन वर्षांपासून राजस्थानातील सावकारांची टोळी वणी, झरी, मारेगाव परिसरात ठिय्या देऊन असली तरी या बेकायदेशिर सावकारीबाबत प्रशासकीय यंत्रणा अनभिज्ञ आहे. तालुक्याच्या ठिकाणी किरायाच्या खोल्या करून हे सावकार वास्तव्याला असल्याची माहिती एका जाणकाराने दिली. पाच ते सहा जणांचे हे टोळके ग्रामीण भागातील गरजूंना हेरून त्यांना अव्वाच्या सव्वा व्याज आकारून पाच हजारापासून ते ५० हजारांपर्यंत कर्जाचे वाटप करीत आहेत. एखाद्याने एका हंमागात १० हजार रुपये कर्ज घेतले तर त्याला परतफेड करताना १३ हजार रुपये द्यावे लागत आहेत.या राजस्थानी सावकारांनी गावागावांत कमिशनवर आपले एजंट पेरले असून त्यांच्या माध्यमातून सावकारीचा हा अवैध व्यवसाय जोमात सुरू आहे. राजस्थानी सावकारांनी नेमलेले हे एजन्ट स्थानिक गावातीलच रहिवासी असून गरजू लोक त्यांच्या माध्यमातूनच सावकारांपर्यंत पोहचत आहे. जोपर्यंत हा एजन्ट कर्जदाराची शिफारस करीत नाही, तोपर्यंत संबंधिताला कर्ज दिले जात नाही. याबदल्यात एजन्टांनाही चांगले कमिशन मिळत आहे. कर्जाने दिलेल्या रकमेची वसुली करण्याची जबाबदारीदेखील या एजन्टांवरच सोपविली जाते.एजन्टाने शिफारस केल्यानंतर राजस्थानी सावकारांची ही टोळी सर्वप्रथम कर्जदाराच्या घरी जाऊन परिस्थितीची चाचपणी करतात. त्याच्या परिस्थितीची पाहणी करूनच त्यानुसार त्याला कर्जाची रक्कम दिली जाते.वणी, मारेगाव व झरी तालुक्यात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला जातो. यंदा मात्र कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना ५० टक्क्यापेक्षाही कमी उत्पादन झाले. तूर उत्पादकांना अद्याप चुकारेच मिळाले नाहीत. सर्वस्वी शेती व्यवसायावर अवलंबून असणाºया ग्रामीण भागातील आर्थिक घडी चांगलीच विस्कटली आहे. परिणामी त्याचाच गैरफायदा अवैध सावकारांकडून घेतला जात आहे. त्यातून ग्रामीण नागरिकांची लूट केली जात आहे. या अवैैध सावकारांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी होत आहे.अण्णांकडून कर्जाच्या रकमेसोबत साहित्याची विक्रीवणी, झरी, मारेगाव तालुक्यात राजस्थानी सावकारांचा प्रवेश होण्याअगोदर आंध्रप्रदेशातील अण्णांचा या भागात दबदबा होता. तो आताही आहे. मात्र या सावकारांचा कर्ज वाटपाचा फंडा आहे. या सावकारांकडून कर्जाच्या रकमेसोबत बॅटरी, ब्लँकेट यासारखे साहित्य कर्जदाराच्या माथी मारले जाते. विशेष म्हणजे दामदुप्पट किंमतीत हे साहित्य कर्जदाराला दिले जाते. ते पैसे कर्जासोबत वसुल केले जाते. त्यातून कर्जदाराची मोठी लूट होत आहे.