कळंब : सुकळी रोडवरील राम मंदिराजवळ एका कापड व्यावसायिकाला अडवून बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्याजवळून ८०० रुपये आणि कपड्याचा गठ्ठा लुटारुंनी लांबविला. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजता घडली.योगेश भानुदास टोणे (३४) रा. आष्टी हा युवक दुचाकीवर परिसरातील गावांमध्ये कपडे विकण्याचा व्यवसाय करतो. दुपारी सुकळी रोडने जाताना मोटरसायकलस्वार तीन युवकांनी त्याला अडविले. त्याच्याजवळील पैसे आणि साहित्याची मागणी केली. विरोध केल्याने त्याला बेदम मारहाण लुटण्यात आले. यापूर्वी या परिसरात लुटमारीच्या अनेक घटना घडल्या. शिक्षक महिलांनाही याच रस्त्यावर अडवून लुटण्यात आले. अजूनपर्यंत एकाही घटनेतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. आणखी एकास अटकदोन दिवसांपूर्वी दत्तापूर टेकडी येथे सत्यनारायण नुगुरवार रा. पाटणबोरी या दाम्पत्याला लुटण्यात आले. या प्रकरणातील दोन आरोपींना मंगळवारी अटक करण्यात आली. बुधवारी आणखी एकाला अटक केली आहे. विष्णू किसन कासार (२५) असे त्याचे नाव आहे. पुढील तपास ठाणेदार बी.जी. कऱ्हाळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ जगताप, जमादार विजय बोम्बेकर करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
कापड व्यावसायिकाला सुकळी येथे लुटले
By admin | Updated: May 26, 2016 00:10 IST