यवतमाळ : येथील सेमिनरी ले-आऊटमध्ये मंगळवारी भर दुपारी अनिल खिवसरा यांच्या घरी सहा सशस्त्र दरोडेखोरांनी घरातील दोन महिलांना धमकावून दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोर त्यांची बंदूक विसरले होते. ही बंदूक पोलिसांनी जप्त केली असून ती आवाज करणारी छर्ऱ्याची बंदूक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपासाला वेग देण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येत आहे. शहर पोलिसांसह, एलसीबीची दोन पथके व टोळीविरोधी पथकालाही तपासाची जबाबदारी सोपविली आहे. काही दिवसांपासून घराची रेकी करून नंतरच हा दरोडा घातला असावा, दरोडेखोर हे जिल्ह्याबाहेरील असावे, त्यांनी स्थानिक व्यक्तीच्या माध्यमातून माहिती मिळवून हा दरोडा टाकला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. (प्रतिनिधी)
दरोडेखोर विसरलेली ‘ती’ बंदूक छर्ऱ्याची
By admin | Updated: September 29, 2016 01:19 IST