शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंच्या खर्चानंतरही रस्ते खिळखिळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 21:59 IST

शहरातील मुख्य रस्ते खाचखळग्यांनी खिळखिळे झाले आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी लाखोंचा खर्च होत आहे. तरी शहरातील रस्ते अजूनही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्ते दुरूस्त न झाल्याने दररोज अपघात होत आहेत. यानंतरही नगरपरिषद प्रशासनाला उसंत नाही.

ठळक मुद्देदररोज अपघात : यवतमाळ नगरपरिषदेच्या एककल्ली कारभारावर नागरिकांचा रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील मुख्य रस्ते खाचखळग्यांनी खिळखिळे झाले आहे. रस्त्यांच्या डागडुजीसाठी लाखोंचा खर्च होत आहे. तरी शहरातील रस्ते अजूनही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. रस्ते दुरूस्त न झाल्याने दररोज अपघात होत आहेत. यानंतरही नगरपरिषद प्रशासनाला उसंत नाही.शहरामध्ये लगतचा ग्रामीण भाग विलीन झाला, तेव्हापासून रस्त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. मुख्य रस्ते अनेक कोट टाकून मजबूत होत आहे. याचवेळी शहरातील खिळखिळे रस्ते दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.सत्यनारायण ले-आऊट, शिंदे प्लॉट, सिंघानियानगर, वाघापूर रोड, राऊतनगर, रंभाजीनगर, सानेगुरूजीनगर, संकटमोचन, माळीपुरा, पाटीपुरा, कारागृहालगतचा भाग, आर्णी रोडचा काही पॅच अजूनही नादुरूस्त आहे.विशेष म्हणजे, हे सर्व रस्ते अत्यंत वर्दळीचे आहे. या ठिकाणची असलेल्या खाचखळग्यामुळे सारखे अपघात घडत आहेत. स्पाँडेलाईटीससारख्या आजारांसोबत वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेकांना रूग्णालयात भरती व्हावे लागले. यानंतरही शहरातील विविध रस्त्यांच्या डागडुजीचा विचार प्रशासनाने अद्यापही केलेले नाही.नगरपरिषदेला इतर रस्ते दिसत नाही का?नगरपरिषद प्रशासनाने एकाच रस्त्यावर अनेकदा ‘कोट’ टाकून ते मजबूत करीत आहे. तर दुसरीकडे काही रस्ते वर्षानुवर्षांपासून नादुरुस्त आहेत. प्रशासनाला इतर नादुरुस्त दिसत नाही का, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. एकाच रस्त्यावर भर देण्यापेक्षा शहरातील अत्यंत दैनावस्था झालेल्या इतरही रस्त्यांवरील खाचखळगे दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन हा विषय किती गांभीर्याने घेते, यावरच संपूर्ण बाब अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा