शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी श्रीरामपूरवासीयांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:27 IST

गाव तेथे रस्ता, हे शासनाचे बीद्र आहे. सर्व लहानसहान गावे, पोड, तांडा वस्त्या रस्त्याने जोडण्याची शासनाची योजना असताना तालुक्यातील १०० टक्के कोलामांची वस्ती असलेले आदिवासीबहुल ....

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा : शासनाच्या उद्देशाला हरताळ, महसूल प्रशासन हतबल

ऑनलाईन लोकमत मारेगाव : गाव तेथे रस्ता, हे शासनाचे बीद्र आहे. सर्व लहानसहान गावे, पोड, तांडा वस्त्या रस्त्याने जोडण्याची शासनाची योजना असताना तालुक्यातील १०० टक्के कोलामांची वस्ती असलेले आदिवासीबहुल श्रीरामपूर या महसुली गावाला हक्काचा रस्ता देण्यास महसूल प्रशासन हतबल ठरला आहे.तालुक्यातील कुंभा महसूल मंडळाअंतर्गत रामपूर लघुसिंचन तलावालगत गावठाणावर कुंभा गावात समाविष्ठ असणारे रामपूरनामक कोलाम पोड वसलेले आहे. या पोडाला १९९४ साली स्वतंत्र महसूली गावाचा दर्जा मिळावा व या गावाचा समावेश इंदिराग्राम ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला. या ३०० लोकवस्तीच्या गावाला पूर्वी सरळ रस्ता होता, असे वयोवृद्ध गावकरी सांगतात. पण सदर रस्ता आज गाव नकाशावरूनच बेपत्ता झाला आहे. १९७०-७१ साली रामपूर लघुसिंचन तलाव बांधण्यासाठी पाटबंधारे विभागाने अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर तलावाच्या भिंतीच्या बाजूने संंबंधित विभागाने बांधलेल्या रस्त्याने जवळचा रस्ता म्हणून येथील नागरिकांनी जाणे-येणे सुरू केले व तोच रस्ता वहिवाटीचा ठरला. आज त्याच रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने केवळ बैलबंडी जाण्यापुरता रस्ता शिल्लक राहिला. याच कच्च्या रस्त्यावरून चिखल, काटे, गोटे तुडवित मार्गक्रमण नागरिक करतात. पावसाळ्यात तर भयानक हाल होतात, रस्त्याअभावी गावात वाहने, साधी दुचाकीसुद्धा जात नाही. आजारी रूग्णांना खाटेवर टाकून मुख्य रस्त्यावर अणावे लागते. तसेच तलावाच्यो वेस्ट वेअरच्या पाण्यातून मार्ग शोधावा लागतो.