शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

नव्या राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीच्या वाटेवर

By admin | Updated: November 11, 2016 02:08 IST

धारणी ते करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा मार्ग प्रस्तावित आहे. त्याचा प्रस्ताव दिल्लीत पोहोचला असून मंजुरीच्या वाटेवर आहे.

धारणी ते करंजी : ३१५ किलोमीटर लांबी, नांदगाव खंडेश्वरला उड्डाणपूल, अनेक पुलांचा समावेश यवतमाळ : धारणी ते करंजी हा ३१५ किलोमीटरचा नवा मार्ग प्रस्तावित आहे. त्याचा प्रस्ताव दिल्लीत पोहोचला असून मंजुरीच्या वाटेवर आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाल्यानंतर धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या धारणी ते करंजी या नव्या महामार्गाचे सर्वेक्षण केले गेले. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट या अतिदुर्गम क्षेत्रातून हा महामार्ग सुरू होणार आहे. या मार्गात परतवाडा-अचलपूर-अमरावती-बडनेरा-नांदगाव खंडेश्वर-नेर-यवतमाळ-जोडमोहा-रुंझा-मोहदा-करंजी ही प्रमुख गावे राहणार आहेत. मध्यप्रदेशातून येणारी वाहतूक चंद्रपूर तसेच तेलंगणा-हैदराबादकडे वळविण्यासाठी या मार्गाचा उपयोग होणार आहे. या मध्यमातून राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ व ७ जोडला जाणार आहे. ३१५ किलोमीटरच्या या महामार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मागासक्षेत्र, पर्यटन क्षेत्र, धार्मिक क्षेत्र या महामार्गाद्वारे जोडले जाईल. सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या महामार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठविण्यात आला आहे. आगामी दोन आठवड्यात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर या मार्गाचे भूसंपादन प्रारंभ होणार आहे. धारणी ते करंजी या महामार्गावर नांदगाव खंडेश्वर व अन्य काही ठिकाणी उड्डान पूल उभारले जाणार आहे. प्रमुख गावांमधून बायपास काढण्यात आला आहे. नेरमध्ये यवतमाळकडे येताना डाव्या हातावरून बायपास काढावा यासाठी राजकीय दबाव होता. परंतु सर्वेक्षण करणाऱ्या प्राधिकृत यंत्रणेने हा दबाव झुगारुन नेरच्या उजव्या बाजूने हा बायपास ‘ओके’ केला. डाव्या बाजूने बायपाससाठी राजकीय इच्छाशक्ती असली तरी या यंत्रणेने मात्र तो ‘फिजीबल’ नसल्याचे म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ‘बायपास’चे १६ नोव्हेंबरला सादरीकरणधारणी ते करंजी या ३१५ किलोमीटरच्या महामार्गात अनेक ठिकाणी बायपास येणार आहे. काही ठिकाणी उड्डान पूल उभारावे लागणार आहे. या बायपास व पुलांबाबत नॅशनल हायवेचे प्रादेशिक प्रमुख चंद्रशेखर यांच्यापुढे १६ नोव्हेंबर रोजी सादरीकरण होणार आहे. नेरमधील बायपासबाबत अलिकडेच लोकप्रतिनिधी व प्रशासनाची संयुक्त बैठक झाली होती. नेर ते यवतमाळ मार्गावर उजव्या बाजूनेच बायपास कसा योग्य आहे, हे पटवून दिले गेले होते. १६ नोव्हेंबरच्या सादरीकरणात या महामार्गावरील बायपास व उड्डान पुलाबाबत चंद्रशेखर यांची मोहर उमटणार आहे.