शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने नदी-नाले तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:33 IST

बहुप्रतिक्षीत दमदार पावसाचे अखेर सोमवारी वणी उपविभागात आगमन झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सोमवारी दुपारपासून बरसत असलेल्या या पावसामुळे मंगळवारी वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या चारही तालुक्यात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअनेक गावांचा संपर्क तुटला : वणीतील सखल भागात पाणी साचले

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : बहुप्रतिक्षीत दमदार पावसाचे अखेर सोमवारी वणी उपविभागात आगमन झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. सोमवारी दुपारपासून बरसत असलेल्या या पावसामुळे मंगळवारी वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा या चारही तालुक्यात पूरपरिस्थीती निर्माण झाली आहे. पुरामुळे पांढरकवडा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.गेल्या अनेक वर्षानंतर यावर्षी या भागात पावसाने विलंबाने हजेरी लावली. ७ जूनला मृग नक्षत्राला प्रारंभ झाला. त्यानंतर एक ते दोनवेळा पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या उरकवून टाकल्या. परंतु हवामान खात्याचा अंदाज चुकला. पावसाने कायमच दडी मारली. परिणामी कपाशी, सोयाबीन, तूर, आदी पिके धोक्यात आली. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नसता, तर ही पिके करपली असती. परंतु गुरूवारपासून अधुनमधून या भागात पाऊस येऊ लागला. त्यामुुुुळे शेतकरी सुखावला. मात्र सोमवारी दुपारपासून पावसाचा चांगलाच जोर वाढला. गेल्या २४ तासापासून वणी, झरी, मारेगाव व पांढरकवडा या तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील खुनी नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. तसेच या परिसरातील मांडवी, पिवरडोल, गवारा, माथार्जुन या गावांचा संपर्क तुटला आहे. वाऱ्हा या गावापासून कवठा या गावाकडे जाणाऱ्या पुलावरून पाणी असल्याने या दोनही गावांचा संपर्क तुटला आहे. सोमवारी दुपारपर्यंत कोरडी असलेली निर्गुडा नदीदेखील संततधार पावसाने दुथडी भरून वाहत आहे. वणी, मारेगाव, पांढरकवडा व झरी या चारही तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. अनेक शेतातदेखील पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले होते.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर