शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

धोका वाढतोय; 11 जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 22:23 IST

मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारानंतर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता २८ इतकी झाली आहे. यातील २४ जण जिल्ह्यातील तर चौघे बाहेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एकंदर ९४२ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यातील ११ पॉझिटिव्ह तर ९३१ अहवाल निगेटिव्ह आले.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी सहा, सोमवारी चार रुग्ण आढळले होते, तर मंगळवारी एकाच दिवसात ११ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारानंतर एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता २८ इतकी झाली आहे. यातील २४ जण जिल्ह्यातील तर चौघे बाहेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एकंदर ९४२ जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यातील ११ पॉझिटिव्ह तर ९३१ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७३ हजार चार इतक्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ७१ हजार १८८ नागरिक कोरोनामुक्त झाले, तर १७८८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. एकंदर सात लाख ८६ हजार ९०४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यातील सात लाख १३ हजार ८०१ अहवाल निगेटिव्ह आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९.२७ असून, दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर मंगळवारी १.१७ होता, तर मृत्यू दर २.४५ इतका आहे. दोन महिने रुग्णवाढ नियंत्रणात दिसत होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात चाचण्याही वाढलेल्या आहेत. त्यासोबतच पाॅझिटिव्ह अहवालही वाढले आहे. रविवारी सहा जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले तर सोमवारी चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारीही तब्बल ११ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना नागरिक मात्र मास्क न घालता बाजारपेठेत फिरताना आढळत आहेत. ३१ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाने सुधारित निर्देश जारी करून निर्बंध वाढविले आहे. मात्र जमावबंदीच्या काळातही सार्वजनिक ठिकाणी नागरिक फिरताना दिसत आहे. यातून कोरोना नियंत्रण नेमके कसे होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

दुसऱ्या दिवशी दहा हजार विद्यार्थ्यांनी घेतली लस - सोमवारपासून जिल्ह्यात १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी तब्बल आठ हजार २३८ विद्यार्थ्यांनी पहिला डोस घेतला तर मंगळवारी दुसऱ्या दिवशीही प्रतिसाद वाढला. मंगळवारी दहा हजार विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या