शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पैनगंगेचा पूलही खचण्याचा धोका

By admin | Updated: November 9, 2014 22:34 IST

विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील धनोडा येथील पुलाच्या जवळच वाळूचा बेसुमार उपसा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तस्करांनी चक्क पुलाच्या पिल्लरजवळच वाळूसाठी मोठ्ठाले खड्डे खोदले आहे.

बेसुमार वाळू उपसा : धनोडा येथे पिल्लरजवळच मोठमोठे खड्डेरितेश पुरोहित - महागाव विदर्भ-मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील धनोडा येथील पुलाच्या जवळच वाळूचा बेसुमार उपसा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तस्करांनी चक्क पुलाच्या पिल्लरजवळच वाळूसाठी मोठ्ठाले खड्डे खोदले आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरीवरील पुलासारखी अवस्था या पुलाचीही होण्याची भीती निर्माण झाली आहे. महागाव तालुक्यातील धनोडा येथून पैनगंगा उत्तरवाहिनी वाहते. विशाल पात्र असलेल्या या पैनगंगेत मोठ्या प्रमाणात दर्जेदार रेती आहे. या रेतीवर गेल्या कित्येक वर्षांपासून तस्करांचा डोळा आहे. लिलावातील अटी-शर्तीचा भंग करून कंत्राटदार मनमानी पद्धतीने बेसुमार वाळूचा उपसा करतात. याचा फटका आता पैनगंगेवरील पुलाला बसण्याची भीती निर्माण झाली आहे. पैनगंगा नदीवर पुलासाठी १९५८ साली पायाभरणी करण्यात आली. तर १९६२ साली या पुलाचे उद्घाटन झाले. १६ गाळे असलेल्या या पुलाची लांबी ६५० फूट असून रुंदी ३६ फूट आहे. तसेच नदी पात्रापासून पूल ४० मीटर उंच आहे. विशालकाय पूल दगडी चिऱ्यात बांधला असून त्यावेळी सात लाख ३६ हजार ३६५ रुपये खर्च या पुलावर करण्यात आला होता. पैनगंगा नदीत पूस, शीप आणि गरुड गंगा या तीन नद्या येऊन मिसळतात. त्याचे पाणी या पुलाखालूनच वाहून जाते. पैनगंगेचे पात्र विशाल असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात रेती आहे. या रेती घाटावरून वाळू उपशासाठी प्रचंड स्पर्धा दिसून येते. दररोज ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक होते. मनुष्यबळ आणि जेसीबीच्या सहाय्याने नदी पात्रातून वाळू उपसली जाते. मात्र चढउतारासाठी पुलाजवळचा भाग सहज असल्याने त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जातो. पुलाच्या १६ ही पिल्लरजवळ पाच पाच फुटाचे खोल खड्डे रेती उपसल्यामुळे पडले आहे. पायव्याजवळचा दगडही उघडा पडल्याचे दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कुरणपिंपरी या गावातील गोदावरी नदीवरील पुलासारखीच या पुलाची अवस्था होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने रविवारी या पुलाची पाहणी केली. तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदास खाडे, वामनराव चव्हाण या गावकऱ्यांनी सांगितले की, कंत्राटदार पुलाच्या अगदी जवळूनच रेती उपसत आहे. गेल्या ५० वर्षांपासून नदीपात्रात रेतीचे उत्खनन होत आहे. परंतु पाच वर्षांपासून पुलाजवळूनच रेती खोदल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.