शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील दंगलीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : येथील शाहीनबाग आंदोलन समितीच्या महिलांनी महात्मा फुले चौकात धरणे देत दिल्लीतील दंगलीचा निषेध नोंदविला. ...

ठळक मुद्देराष्ट्रपतींना निवेदन । चिथावणीखोरांवर कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील शाहीनबाग आंदोलन समितीच्या महिलांनी महात्मा फुले चौकात धरणे देत दिल्लीतील दंगलीचा निषेध नोंदविला. या दंगलीसाठी चिथावणी देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी महिलांनी केली. शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींकडे निवेदन पाठविण्यात आले.केंद्र सरकारने घटनाबाह्यरित्या नागरिकत्व संशोधन कायदा आणला आहे. या कायद्याविरोधात संपूर्ण देशात आंदोलन सुरू आहे. दिल्ली येथील शाहीनबाग आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहे. यवतमाळातही शाहीनबाग आंदोलन समिती सक्रीय आहे. समितीचे अन्यायाविरोधात आंदोलन सुरू आहे. यातच दिल्लीत दंगलीची घटना झाली. संरक्षण करणारे पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे. दिल्लीत दंगल घडविणाºयांच्या विरोधात कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. या सांप्रदायिक दंगलीमध्ये आतापर्यंत ३८ निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. या गंभीर घटनेची पोलीस चौकशी करण्याची तसदी भाजप सरकारने घेतली नाही.दिल्ली दंगल भडकविण्यासाठी भाजपचे अभय वर्मा, मंत्री अनुराग ठाकूर, परवेश वर्मा यांनी स्फोटक विधाने केली. त्यानंतर उसळलेल्या दंगलीमध्ये अल्पसंख्याक मुस्लिम, हिंदू, पोलीस कर्मचारी यांची जीवितहानी झाली. कोट्यवधीच्या संपत्तीचे नुकसान झाले. या घटनेचा निषेध यवतमाळ शाहीन बाग आंदोलन समितीच्या महिलांनी केला. समितीच्या सादीया सय्यद, सलमा शाहीन, हुमारिया आयेशा, सदिया खान, माहेविश राणा यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले. तत्पूर्वी महात्मा फुले चौकात निदर्शने करून तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. संपूर्ण मार्गच बंद केला होता.

टॅग्स :National Register of Citizensएनआरसी