शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

आधी बोटाला शाई मग होईल लगीन सराई !

By सुरेंद्र राऊत | Published: April 26, 2024 11:59 AM

Yawatmal : मतदानानंतर यवतमाळहून अमरावतीला नवरदेवाची निघाली वरात.

यवतमाळ : लोकशाहीचा उत्सव साजरा होत असून लोकसभेच्या निवडणूकीचेमतदान होणार आहे. याच दिवशी विवाह होणार असल्याने दिग्रसच्या संदेश अस्वार या युवकाने प्रथम मतदान करून आपली वरात जवळपास १३० किलोमीटर अमरावती करिता निघाली आहे . राष्ट्रीय  कर्तव्य प्रथम मनात ठेवूनच संदेश  मतदान करून बोहल्यावर चढणार आहे.

मतदान करणे हे लोकशाहीतील एक महान सोहळा असतो. दर पांच वर्षांनी येणारा हा उत्सव सोहळा संपन्न करण्याची सर्वांचीच इच्छा असते. त्यातही देशाच्या सर्वोच्च सांसदीय प्रणाली कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणजेच खासदार निवडीचा हा सुवर्ण काळ कोणालाही गमवायचा नसतो. निवडणूकीची घोषणा व्हायच्या आधीच संदेश अस्वार व प्रज्ञा सुने यांचा विवाह सोहळाही याच दिवशी म्हणजे निवडणूक मतदानाच्या दिवशीच लग्नाची बहूप्रतिक्षित तारीख निघाल्याने संदेश अस्वार व परिवाराची मात्र पंचाईत झाली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस संदेश अस्वार याचा विवाह अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगिर येथील प्रज्ञा सुने या वधू शी ठरला. विवाह स्थळ व मतदान केंद्र यातील अंतर जवळपास १३० कि.मी.चे लग्न विधी पार पाडायचे की मतदान करायचे या द्विधा मनस्थितीत असणाऱ्या "संदेश"ने एक महत्वाचा  निर्णय घेतला. "आधी लग्न लोकशाहीचे... मग माझे..." हा निर्णय समस्त मतदारांना अनमोल "संदेश" देणारा ठरला आहे. आज सकाळी मतदान करून वर आपली वरातत्याने अमरावती येथे नेली आहे .   संदेशच्या या निर्णयाचे समस्त लोकशाही प्रेमींनी स्वागत केले असून संदेश अस्वार व परीवाराचे कौतुक होत आहे. इतर नागरिकांनी देखील या अनोख्या विवाहाचा आदर्श घेत देशाप्रती असलेले कर्तव्य मतदान करून पार पडण्याची गरज आहे.

निवडूणुकीविषयी बोलताना संदेश यांनी सर्व मतदारांना " आधी मतदान , नांतर जलपान " असे आवाहन केले आहे .  

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Yawatmal Collector Officeयवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूकVotingमतदान