शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

रिव्हॉल्व्हर, काडतुसे गायब

By admin | Updated: May 16, 2015 00:19 IST

वडगाव रोड पोलीस ठाण्याचा संपूर्ण मालखानाच पोखरलेला असून तेथून जप्तीतील रिव्हॉल्व्हर आणि काडतुसेही गायब ...

ठाणेदारांनीच दडपल्या चोऱ्या : वडगाव रोड ठाण्याचा मालखानाच पोखरलेला यवतमाळ : वडगाव रोड पोलीस ठाण्याचा संपूर्ण मालखानाच पोखरलेला असून तेथून जप्तीतील रिव्हॉल्व्हर आणि काडतुसेही गायब असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. दरम्यान, ४१ लाख ६६ हजाराच्या चोरीतील आरोपी निर्मल राठोड याला न्यायालयाने २० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी हवालातील जप्त रक्कम वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या मालखान्यात ठेवण्यात आली होती. मात्र या मालखान्याचा रक्षक असलेल्या पोलीस शिपाई निर्मलनेच या रकमेवर हात मारला. हा गुन्हा सुरुवातीला दडपण्याचाही प्रयत्न झाला. या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्यातील ३९ लाख रुपयांची रक्कम जप्त झाली आहे. त्याच्याकडून आणखी ३ लाख ५२ हजार रुपये जप्त करायचे आहे. त्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. या चोरीत निर्मलचे आणखी काही मित्र सहभागी असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. खरोखरच आणखी कुणाचा हात, पडद्यामागून पाठबळ आहे का याची शोध मोहीम स्थानिक गुन्हे शाखेमार्फत केली जात आहे. विशेष असे निर्मलने यापूर्वीही याच मालखान्यातून मोबाईल, मोटरसायकल चोरली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ठाणेदारांनी वरिष्ठांना माहिती देऊन त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. किमान त्याला मालखान्याच्या जबाबदारीतून मुक्त करून त्याची इतरत्र नियुक्ती करणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात असे काहीही न करता ठाणेदारांनी चोरीतील मालाची रक्कम भरुन घेऊन निर्मलला पुन्हा त्याच जागी ठेवले. त्यामुळेच वरिष्ठ पाठीशी आहे, असा समज होऊन निर्मलची हिंमत वाढली आणि त्याने थेट ४२ लाखांच्या रोकडवरच हात मारला. या मालखान्यात अशा अनेक भानगडी असल्याचे सांगितले जाते. तेथून रिव्हॉल्व्हर , काडतूस व अन्य साहित्य बेपत्ता असल्याची माहिती आहे. या मालखान्याचा हिशेब जुळविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)४३ लाखांची रोकड ट्रेझरीत का नाही ?या मालखान्याची सखोल तपासणी झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता पोलीस खात्यातूनच वर्तविली जात आहे. हवालाच्या या रकमेबाबतही पोलीस दलात बरीच चर्चा आहे. रक्कम परत देण्यास टाळाटाळ करणे, न्यायालयात ‘से’ देताना अडवणूक करणे असे प्रकार घडले आहेत. एवढी मोठी रक्कम पोलीस ठाण्याच्या मालखान्यात ठेवलीच कशी हा मुख्य प्रश्न आहे. वास्तविक ही रक्कम शासनाच्या तिजोरीत अथवा पोेलीस अधीक्षक कार्यालयाच्या कॅश रुममध्ये, ट्रेझरीत ठेवणे अपेक्षित होते. मात्र ती मालखान्यात ठेवण्यामागे चांगला हेतू नसल्याचे बोलले जाते. पोलीस ठाण्यांचे दरवर्षीच वरिष्ठांकडून वार्षिक निरीक्षण केले जाते. या निरीक्षणादरम्यान मालखान्यातील गैरप्रकार उघड का होत नाही, असाही सवाल आहे. जिल्ह्यात वणी विभागातील आणखी एका पोलीस ठाण्याच्या मालखान्यात असाच गोंधळ असल्याचेही बोलले जाते.