शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

क्रांतिदिनी आंदोलनांचा ‘षटकार’

By admin | Updated: August 10, 2016 01:12 IST

यवतमाळ शहरात मंगळवार हा आंदोलनवार ठरला. विविध मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, विदर्भवादी कार्यकर्ते,....

जनतेचा एल्गार : काँगे्रस कार्यकर्ते, डॉक्टर्स, विदर्भवादी, किसान आघाडी, अंगणवाडी सेविका सारेच रस्त्यावर उतरले यवतमाळ : यवतमाळ शहरात मंगळवार हा आंदोलनवार ठरला. विविध मागण्यांसाठी काँग्रेस कार्यकर्ते, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, विदर्भवादी कार्यकर्ते, शेतकरी किसान आघाडी आदी सर्वेच रस्त्यावर उतरले. प्रत्येकांनी आपल्या मागण्या शासन दरबारी पोहोचविण्यासाठी अभिनव मार्ग स्वीकारला होता. प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. एकाचवेळी पाच ते सहा आंदोलने झाल्याने बंदोबस्त लावताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय यांनी आपल्या कार्यकाळातील विकास कामांचा डांगोरा पिटणारे होर्डिंग संपूर्ण शहरात लावले. त्याची पोलखोल काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. यवतमाळ शहरातील आणि लगतच्या वाढीव हद्दीतील रस्ते खड्डेमय झाले आहे. या विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगत या कार्यकर्त्यांनी ‘जाहीर आभार’ हे गांधीगिरी आंदोलन केले. खड्डे दाखवित हे कार्यकर्ते नगराध्यक्षांचे अभिनंदन व जाहीर आभार असे नमूद असलेले फलक हातात घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे प्रदीप डंभारे, उमेश इंगोले, अरुण राऊत, अशोक बोबडे, घनश्याम अत्रे, अरुण ठाकूर, बबलू देशमुख, राजू इंगोले, बालू काळे आदी सहभागी झाले होते. ९ आॅगस्ट क्रांती दिनाचे निमित्त साधून स्वतंत्र विदर्भासाठी माजी आमदार विजयाताई धोटे यांच्या नेतृत्त्वात नेताजी चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी विदर्भाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा तसेच सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी विदर्भवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्री १ वाजताच्या सुमारास चार्ली कमांडोंनी वसतिगृहात प्रवेश करून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप करीत स्टुडंट कौन्सिल आॅफ मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. या मारहाणीविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार नोंदविली. मात्र त्यांच्यावरच शस्त्र हिसकावल्याचा आरोप लावण्यात आला. या पोलिसांवर कारवाईच्या मागणीसाठी हा मोर्चा होता. त्यात संघटनेचे अध्यक्ष डॉ. ए.डी. राठोड, डॉ. एस.एच. गवार्ले, तुषार घोंगडे, डॉ. एस.ए. भुयार, डॉ. डी.एस. पटवर्धन, डॉ. जी.एस. मस्के, प्रणित पाखरे यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी किसान आझादी आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. यावेळी माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष राजूदास जाधव, पप्पू भोयर, जितेंद्र ठाकरे, भगवंत नाईनवार, डॉ. दिलीप महाले, सतीश काळे, यशवंत इंगोले, घनश्याम दरणे आदी सहभागी झाले होते. कामगार कायद्याची अंमलबजावणी व्हावी आदी मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्त्वात बसस्थानक चौकात रास्ता रोको केला. यावेळी अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलनात मनिष इसाळकर, दिवाकर नागपुरे, विजय ठाकरे, संजय भालेराव, पी.पी. घाडगे, ज्योती रत्नपारखी, रेखा लांडे, संगीता बांगडे, हिम्मत पाटमासे आदी सहभागी झाले होते. (शहर वार्ताहर)