शंकरबाबांच्या बालगृहातील अनाथ लाजवंतीसोबत आयुष्याची गाठ बांधण्याचा निर्णय दिग्रसच्या श्रीराम वसंतराव सरमोकदम या धडधाकट, सुस्वरूप तरुणाने घेतला. प्रवाहाच्या विपरीत जाणारा श्रीरामचा हा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनीही स्वीकारला. त्याचे आप्त, मित्रमंडळीही लग्नात प्रचंड उत्साहाने सहभागी झाली. त्यामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने ‘सामाजिक’ ठरला. उपस्थितांनीही श्रीरामच्या या क्रांतिकारी निर्णयाचे नुसते कौतुकच केले नाही, तर इतर तरुणांनीही त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
क्रांतिकारी श्रीरामचा जयजयकार !
By admin | Updated: December 13, 2015 02:29 IST